वॉशिंग्टन : मिनिओपोलिस या मिनेसोटा राज्याच्या राजधानीत जॉर्ज प्लॉईड या ४२ वर्षांच्या कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने गळा दाबून खून केल्यानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेच्या 75 हजारहून अधिक शहरांमध्ये संत्पत जमावांकडून निदर्शने करण्यात आली असून अमेरिकेत दंगलीच्या आरोपाखाली 4,100 जणांना अटक करण्या आली आहे. यांपैकी अधिकांश दंगेखोरांना तात्पुरत्या कारागृहांमध्ये ठेवण्यात आल्याचे अमेरिकेच्या पोलिसांनी सांगितले आहे.
जॉर्ज प्लॉईड यांच्या मृत्युनंतर अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या विरोधात रॅली काढून निषेध करण्यात येत आहे. मात्र अमेरिकेतील शहरात काढण्यात आलेल्या एका रॅली दरम्यान मयामी पोलिसांनी संतप्त आंदोलकांसमोर अक्षरश: गुडघे टेकवून दिलगिरी व्यक्त केली.
पोलिसांच्या या भूमिकेनंतर आंदोलन करणाऱ्या जमावांच्या डोळ्यात देखील पाणी आलं आणि आंदोलनकर्त्यांनी हिंसा थांबवण्याचा निर्णय घेतला.
तत्पूर्वी, संपूर्ण अमेरिकेत उसळलेली संताप व निषेधाची लाट व्हाईट हाऊसच्या अगदी दारात पोहोचली. निदर्शनांची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘सिक्रेट सर्व्हिस’ला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलेनिया व १४ वर्षांचा मुलगा बरॉन यांना सुमारे एक तासभर व्हाईट हाऊसच्या खाली तळघरात असलेल्या बंकरमध्ये हलवावे लागले होते.
आसऱ्याची ५० वर्षांतील पहिली वेळ
दहशतवादी हल्ल्यासह अन्य काही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी या अभेद्य बंकरची सोय केलेली आहे. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळात राष्ट्राध्यक्षांना या बंकरचा आसरा घेण्याची वेळ प्रथमच आली. एवढेच नव्हे तर वॉशिंग्टन डीसी या राजधानी क्षेत्रात सुरक्षा दलांनी लागू केलेली सतर्कता ९/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या तोडीची होती. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे नेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यू.) यांच्या हत्येनंतर सन १९६७ मध्ये उसळलेल्या सामाजिक असंतोषानंतर आताचा अमेरिकेतील उद्रेक तीव्र व व्यापक असल्याचे मानले जात आहे.