दुबई-
सौदी अरेबियाचा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचं वर्णन करताना देशाचे माजी गुप्तचर प्रमुख साद अलजबारी यांनी सायको असं केलं आहे. एका मुलाखतीत साद अलजबारी यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. 'आम्ही या मारेकऱ्याने केलेले अत्याचार आणि गुन्हे स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहेत', असं अलजबारी म्हणाले. सौदी अरेबियाच्या गुप्तचर विभागात दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी राहिलेले अलजाबरी यांनी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आगामी काळात अमेरिका आणि इतर देशांसाठी मोठं आव्हान ठरू शकतात असाही दावा केला आहे. तसंच मोहम्मद बिन सलमान खुनी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्याच्या काही दिवस आधी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अलजाबरी यांनी ही माहिती दिली आहे. "प्रिन्स मोहम्मद बिन सलमान मनोरुग्ण आहे. त्याला कोणत्याही भावना नाहीत. अनुभवातून कधीच तो शिकला नाही", असं अलजाबरी म्हणाले.
प्रिन्स सलमान यांची 'टायगर स्कॉड' नावानं गँगप्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे 'टायगर स्क्वाड' नावाची खतरनाक लोकांची टोळी असल्याचा दावा साद यांनी केला आहे. याच टोळीकडून अपहरण आणि खून केले जातात. 'मध्य आशियामध्ये एक मोठं आव्हान बनलेल्या एका विक्षिप्त, खुन्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी येथे आलो आहे. तो अमेरिका आणि संपूर्ण जगासाठी धोका बनू शकतो", असं साद अलजाबरी म्हणाले.
महत्वाची बाब अशी की अलजाबरी हे मोहम्मद बिन नायेफ यांचे दीर्घकाळ सल्लागार होते. जून 2017 पर्यंत ते सौदीचे क्राऊन प्रिन्स होते आणि त्यानंतर मोहम्मद बिन सलमान प्रिन्स बनले.
जीवाला धोका असल्याचे कारण देत कॅनडाला स्थलांतरणअलजाबारीला स्वतःच्या जीवाला धोका वाटला म्हणून ते सध्या कॅनडात आहेत. अलजाबरी यांनी वॉशिंग्टन डीसी कोर्टात देखील सौदीच्या प्रिन्सनं आपल्याला जीवे मारण्यासाठी टोरंटोला एक पथक पाठवल्याचा आरोप केला आहे. दोन आठवड्यांपूर्वी सौदी पत्रकार जमला खशोग्गी यांची इस्तंबूलमध्ये हत्या करण्यात आली होती. साद म्हणाले म्हणाले, "मलाही कदाचित एखाद्या दिवशी मारले जाईल, कारण माझ्याकडे राजघराण्याबद्दल आणि सरकारबद्दल महत्त्वाची माहिती आहे. जोपर्यंत तो मला मेलेलं पाहत नाहीत तोपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत"