वास्को : नौदलात तीस वर्षे सेवेत असलेल्या सी-हॅरिअर्सची जागा बुधवारी नव्या दमाच्या मिग-२९ के लढाऊ विमानांनी घेतली. भारतीय नौदलाच्या इतिहासात बुधवारी ऐतिहासिक क्षणांची नोंद झाली. दाबोळी येथील आयएनएस हंसा तळावर सी-हॅरिअर्सला निरोप देऊन मिग-२९ के विमानाचे स्वागत करण्यात आले. सी-हॅरिअर्स आणि मिग-२९ के विमानांचे नेत्रदीपक संचलन झाले.‘मिग-२९ के’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. प्रतिमिनिट साठ हजार फुटांवरून उड्डाण करण्याची त्याची क्षमता आहे. तसेच मल्टिमोडल रडारवर ते येत नाही. एका मिनिटात शून्य ते एक हजार प्रति किलोमीटर नॉटिकल मैल या वेगाने झेपाविण्याची या विमानाची क्षमता आहे.
मिग-२९ के नौदलाच्या ताफ्यात
By admin | Published: May 12, 2016 3:57 AM