शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नाशिक शिक्षक मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अखेर शिंदेसेनेच्या किशोर दराडेंचा विजय
2
"सत्ताधाऱ्यांना संरक्षण मागावं लागल्याचे देशाने पाहिलं"; राहुल गांधींच्या विधानाचे राऊतांकडून समर्थन
3
"राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी; आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा, मी..."
4
अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; आणखी १४ जणांना मिळू शकते संधी
5
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार का?; उद्धव सेना उमेदवार उतरवण्याच्या तयारीत
6
११००००००००० कोटींचा व्यवहार! बाबा रामदेव यांच्या Patanjali बाबत मोठं अपडेट, कोण घेतंय दंत आणि केश कांती?
7
पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; पोलीस करणार सरकत्या जिन्यांचा तपास
8
Success Story : ज्या घडी डिटर्जेंटचे ब्रँड एम्बेसेडर आहेत बिग बी, त्याचे मालक कोण माहितीये? 'या' राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस फार चांगला जाईल, आर्थिक लाभ संभवतात!
10
दक्षिण कोरियामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या लोकांना भरधाव कारने चिरडलं; ९ जणांचा मृत्यू, 4 जखमी
11
‘XXXXX’...अंबादास दानवेंची सभागृहातच शिवीगाळ; नंतर म्हणाले, "मला अजिबात पश्चात्ताप नाही"
12
हिंदूंबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यानं गदारोळ, भाजपाचा निशाणा तर काँग्रेसचाही पलटवार
13
नीट-यूजी फेरपरीक्षा निकालात टॉपर्सची संख्या घटली; एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण नाहीत
14
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती नाण्याचे विमोचन
15
वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली टीम इंडिया; कॅरेबियन बेटांवर अलर्ट जाहीर
16
नव्या कायद्याचा पहिला गुन्हा फेरीवाल्यावर; तक्रारदारालाच मदत करणाऱ्या तरतुदी
17
डोळ्यांत पाणी, ‘गोल्डन गेट ब्रिज’ची वारी थेट पंढरपूरला; बीएमएम अधिवेशनाचा शानदार समारोप
18
नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठीच, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटले; राहुल गांधींचा आरोप
19
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत ३ महिन्यांत निर्णय; अजित पवारांची घोषणा

Airplane Crash: चमत्कार! विमान क्रॅश झाले, आगीचे लोळ उठले, तरी पायलट आणि प्रवाशाचे प्राण वाचले, कसे? पाहा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 10:02 PM

Airplane Crash: युरोपमधून एका अशा विमान अपघाताची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये विमानाच्या ठिकऱ्या उडाल्या. मात्र त्या विमानातून प्रवास करत असलेला पायलट आणि प्रवाशाला काहीही झाले नाही.

लंडन - अपघाताशी संबंधित कुठली ना कुठली बातमी आपल्यासमोर येत असते. कधी रेल्वे अपघात, तर कधी विमानाच्या अपघाताच्या बातमीने आपल्या काळजाचा थरकाप उडत असतो. अशा अपघातात होणाऱ्या मृत्यूंमुळे आपलं मन हेलावतं. मात्र नुकताच युरोपमधून एका अशा विमान अपघाताची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये विमानाच्या ठिकऱ्या उडाल्या. मात्र त्या विमानातून प्रवास करत असलेला पायलट आणि प्रवाशाला काहीही झाले नाही. एवढ्या मोठ्या अपघातातून प्राण वाचणे म्हणजे मोठा चमत्कारच असल्याची आता चर्चा होत आहे.

ब्रिटनच्या रोचेस्टर विमानतळावरून उड्डाण केलेले विमान अचानक अपघातग्रस्त झाले. त्यानंतर या विमानाला आग लागून त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. मात्र या विमानातून प्रवास करत असलेला वैमानिक आणि प्रवाशाचे प्राण चमत्कारिकरीत्या वाचले. हे दोघेही सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विमान अपघातग्रस्त झाल्यानंतर पायलट आणि प्रवाशी खाली पडले आणि जंगलातील झाडांवर अडकले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

जंगलात एक विमान अपघातग्रस्त झाले आहे, अशी माहिती मिळताच फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिकेसह पथके घटनास्थळावर पोहोचली. तसेच बचावाचे काम सुरू केले. या मदतकार्यादरम्यान, विमान नष्ट झाले असले तरी पायलट आणि प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली. या विमानामध्ये केवळ दोनच प्रवासी होते. ते पती-पत्नी होते. पती पायलट होता. तर पत्नी प्रवाशाच्या रूपात प्रवास करत होती. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. हे विमान जात होते त्या भागात मोठी झाडे होती. त्यांना हे विमान अडकले. या झाडांमुळेच पती-पत्नीचे प्राण वाचले. 

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघातEnglandइंग्लंड