अमेरिकेच्या America) मॅनहॅटनमध्ये (Manhattaen) मिस यूएस (Miss USA) राहिलेली मॉडल चेल्सी क्रिस्टने (Cheslie Kryst) आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेल्सी क्रिस्टने एका बिल्डींगच्या ६०व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या (Suicide) केली. तिचं वय ३० वर्षे होतं. चेल्स क्रिस्टने आज म्हणजे सोमवारी सकाळी ७ वाजून १५ मिनिटानी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी चेल्सीने सोशल मीडियावर एक पोस्टही केली होती.
'डेली मेल' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, मिस यूएस राहिलेली चेल्सी क्रिस्ट एक्स्ट्रा नावाच्या एका मनोरंजन शोची होस्टही होती. चेल्सी क्रिस्टने आत्महत्या का केली याचं स्पष्ट कारण समजू शकलेलं नाही. बिल्डींगवरून उडी मारण्याआधी तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने लिहिलं होतं की, 'तुमचा दिवस आरामदायक आणि शांतीपूर्ण जावो'.
दरम्यान चेल्सीने ज्या बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्या केली. ती त्या बिल्डींगच्या ९व्या मजल्यावर राहत होती. चेल्सी क्रिस्टच्या आत्महत्येचा बातमी समोर येताच तिचे फॅन्स दु:खी झाले.
चेल्सी क्रिस्टने २०१९ मध्ये मिस USA चा खिताब पटकावला होता. ती व्यवसायाने एक वकिल होती चेल्सी नॉर्थ आणि साऊथ कॅरोलिनामध्ये प्रॅक्टिस करत होती. चेल्सी क्रिस्ट मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वकिली करत होती. एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता.