वॉशिंग्टन : प्रसिद्ध पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल यांनी ख्यातनाम हार्वर्ड विद्यापीठाला २५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे. भारतासह दक्षिण अशियायी देशांशी संबंध वाढवावेत या उद्देशाने ही देणगी आहे. विद्यापीठातील साऊथ अशिया इन्स्टिट्यूटसाठी कायमस्वरूपी निधी या देणगीतून निर्माण होईल.इन्स्टिट्यूट भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भुतान, मालदिव्हज, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह दक्षिण अशियायी देशांशी व या देशांतून आलेल्या लोकांशी विद्यापीठाच्या संबंधांसाठी पुढाकार घेईल, असे विद्यापीठाने निवेदनात म्हटले.मित्तल कुटुंबाने फार वर्षांपासून भारतात शैक्षणिक कार्याला व सार्वजनिक धोरण विकासाला पाठिंबा दिलेला आहे, असे विद्यापीठाने म्हटले.मित्तल फाऊंडेशनच्या वतीने मिळालेल्या या देणगीमुळे हार्वर्ड विद्यापीठाची दक्षिण अशिया इन्स्टिट्यूट यापुढे लक्ष्मी मित्तल साऊथ अशिया इन्स्टिट्यूट अॅड हार्वर्ड युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाईल. माझ्या कुटुंबासाठी महत्त्वाची आहे, असे लक्ष्मी मित्तल यांनीम्हटले आहे.हार्वर्ड ही जगातील एक खूप मोठी शैक्षणिक संस्था असून तिच्यात संवाद साधण्याची, विचार व प्रगतीला पुढे नेण्याची विलक्षण क्षमता आहे. जगाच्या विकासात दक्षिण अशियाने महत्त्वाची व प्रभावी भूमिका बजावली आहे, असे मित्तल म्हणाले. जगातील सर्वात मोठी पोलाद कंपनी आर्सेलर मित्तलचे ते अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. (वृत्तसंस्था)
हार्वर्ड विद्यापीठाला मित्तल यांची देणगी, २५ दशलक्ष डॉलर्सचा निधी सुपुर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:11 AM