दुबई : आगामी पाच वर्षांत १ अब्ज नवे मोबाईल ग्राहक होतील असे एका अहवालात म्हटले आहे. नवीन जीएसएम अहवालात म्हटले आहे की, २0१४ च्या अखेरपर्यंत मोबाईल ग्राहकांची संख्या ३.६ अब्ज होती. २0२0 पर्यंत ती ४.६ अब्ज होईल. प्रतिवर्षी ४ टक्क्यांची वाढ त्यात अपेक्षित आहे.अलीकडच्या काळात मोबाईल ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगातील कानाकोपऱ्यात मोबाईल पोहोचला आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच हातात मोबाईल दिसत आहे. दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीने हे शक्य झाले आहे.
मोबाईल ग्राहकांत होणार विक्रमी वाढ
By admin | Published: March 05, 2015 10:54 PM