मॉब लिंचिंगला नोटाबंदी, जीएसटी जबाबदार; राहुल गांधींचा मोदी सरकारवर वार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 09:22 AM2018-08-23T09:22:30+5:302018-08-23T09:22:42+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौ-यावर आहेत.
Next
हॅम्बर्गः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात त्यांनी जर्मनीतल्या हॅम्बर्गमध्ये एका सभेला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला आहे. नोटाबंदीमुळे मॉब लिंचिंगचे प्रकार वाढल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, मॉब लिंचिंगच्या प्रकाराला नोटाबंदीच जबाबदार आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे मॉब लिंचिंगसारख्या हिंसक गोष्टींना प्रोत्साहन मिळाले.