पोलंड - मॉडेल असलेल्या तरुणीच्या फॅशनसाठी, टॅटू कलाकाराने तिच्या दोन्ही डोळ्यांना रंग देण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय तिच्या डोळ्यांसाठी खूप महागात पडला आहे. मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे आणि लवकरच दुसरा डोळा दृष्टिहीन होणार असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.डेली मेलच्या वृत्तानुसार, पोलंडमधील वरोक्लॉ येथे राहणारी अलेक्झांड्रा साडोस्का 25 वर्षांची आहे. डोळे रंगवल्यानंतर लगेचच तिला त्रास होऊ लागला. यानंतर, वेदना सामान्य असल्याच्या सांगून डॉक्टरांनी केवळ पेनकिलर औषधोपचार म्हणून दिले. खरंतर तिला रॅप कलाकार पोपेकांसारखे डोळे रंगवायचे होते. मात्र, ती दृष्टिहीन झाली आहे.
संबंधित टॅटू आर्टिस्टला तरुणीला अंध केल्याच्या आरोपाखाली 3 वर्षांची शिक्षा भोगावी लागू शकते. त्याच्यावर हेतू नसूनही मुलीला अपंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एक तपासही करण्यात आला आहे आणि असे दिसून आले की टॅटू कलाकाराने डोळ्यात रंग भरताना गंभीर चुका केल्या आहेत.
डॉक्टरांनी सांगितले की, मुलीच्या डोळ्यास झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करता येणार नाही. मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे निघून गेली आहे आणि लवकरच दुसरा डोळा निकामी होऊन ती अंध होऊ शकते.