ब्राझीलमध्ये (Brazil) राहणारी एका सुंदर मॉडलचे कारनाने ऐकून पोलीस चक्रावू गेले आहेत. ही सुंदर मॉडल आता खतरनाक गॅंगस्टर बनली आहे. तिच्यावर तिच्या पतीच्या हत्येचा आरोप आहे. मॉडलिंग सोडून गुन्हेगारी विश्वात आलेल्या मॉडलचं नाव कॅमिला मरोदिन (Camila Marodin) आहे. तिने ७ नोव्हेंबरला पतीवर गोळीवर झाडून त्याची हत्या केली होती. ही घटना कॅमिलाच्या मुलाच्या वाढदिवशी घडली. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा समोर आलं की, हल्लेखोर ज्या गॅंगचे होते, त्या गॅंगची मुख्य कॅमिला मरोदि आहे.
आईच्या घरी सापडली पिस्तुल
‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी गॅंगस्टर कॅमिला मरोदिन (Camila Marodin) ला अटक केली आहे. कॅमिलाने पोलिसांना सांगितलं होतं की, तिचा पती कदाचित एखाद्या चुकीमुळे मारला गेला. पण चौकशीतून समोर आलं की, रिकार्डो मॅरोडिनला कॅमिलाच्या गॅंगनेच मारलं होतं. इतकंच नाही तर कॅमिलावर दोन पोलिसांच्या हत्येचाही आरोप आहे. मॉडलची गॅंगस्टर बनलेल्या कॅमिलाला ती तिच्या आईच्या घरून येत असताना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आईच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना हल्ल्यात वापरलेली पिस्तुल सापडली.
लक्झरी कार्स, हत्यारं आणि कॅश जप्त
पोलिसांनी आरोपीच्या घरातून मोठ्या प्रमाणात कॅश आणि शस्त्रे ताब्यात घेतलीत. त्यासोबत अदिकाऱ्यांनी पाच लक्झरी कार्स आणि एक मोटारबाइकही जप्त केली आहे. गेल्या आठवड्यात रिकार्डो मॅरोडिन आणि कॅमिलाच्या मुलाचा चौथी वाढदिवस होता. यावेळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा चार हल्लेखोर आले आणि त्यानी रिकार्डोवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला.
पुराव्याची वाट बघत होते पोलीस
पोलीस प्रवक्ता कर्नल बारोसोने सांगितलं की, आरोपीच्य अटकेची योजना आधीच करण्यात आली होती. फक्त काही पुरावे जमवण्याची गरज होती. जसे पुरावे मिळाले तिला अटक केली. गॅंगस्टर कॅमिलानेच तिच्या पतीची हत्या केली होती आणि दोन पोलिसांचीही हत्या केली होती. कर्नल बारोसो म्हणाले की, कॅमिलाच्या बेकायदेशीर संपत्तीचीही माहिती मिळाली. ती एक आलिशान लाइफ जगत होती, तिने खूप प्रॉपर्टी जमवली आहे.