इस्लामाबाद- पाकिस्तानात सध्या एका पुस्तकाने चांगलीच खळबळ माजली आहे. वेगवेगळे दावे करणाऱ्या या पुस्तकावर संपूर्ण पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे. नरेंद्र मोदी यांचया नेतृत्त्वाखाली आजच चार वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे यातील माहितीवर अधिकच चर्चा केली जात आहे. आयएसआयचे माजी डीजी असद दुरानी आणि रॉचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी भारत व पाकिस्तान यांच्या संबंधांवर स्पाय क्रॉनिकल हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्याचा आयएसआयला आनंद झाला होता. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहिल्यास ते काहितरी मोठा निर्णय घेऊन खळबळ उडेल व त्याचा फायदा आपल्याला होईल अशी त्यांची धारणा होती. नरेंद्र मोदी या पदावरती राहिल्यास त्यांच्या निर्णयामुळे भारताच्या सेक्युलर प्रतिमेला धक्का पोहोचेल आणि त्याचा वैश्विक पातळीवर पाकिस्तानला फायदा होईल असे आयएसआयचे मत होते असे दुरानी यांनी या पुस्तकात मत मांडले आहे.
...म्हणून ISI ला भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच हवेत; माजी अध्यक्षांचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 11:58 AM