नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा या तिन्ही पक्षांमध्ये दिल्लीत राजकीय चढाओढ पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'आप'ला पराभूत करण्यासाठी दिल्लीत भाजपाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. केंद्रीय मंत्र्यापासून खासदारांपर्यंत अनेक नेते भाजपाच्या प्रचारात उतरल्याचं दिसून येत आहे.
मात्र राजधानी दिल्लीत सुरु असणाऱ्या या राजकीय युद्धात पाकिस्तानच्या मंत्र्यानेही एन्ट्री घेतली आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांने नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला पराभूत करा असं आवाहन दिल्लीकरांना केले आहे. पाकिस्तानमधील बहुचर्चित मंत्री फवाद हुसैन यांनी ही मागणी केली आहे. हुसैन आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी माध्यमात चर्चेत असतात. ते पाकिस्तान सरकारमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत.
फवाद हुसैन यांनी ट्विट करुन म्हटलंय की, भारतातील लोकांनी नरेंद्र मोदींना हरवलं पाहिजे. यावेळी दिल्ली विधानसभेत हरण्याची भीती असल्याने त्यांच्याकडून दबावाखाली अनेक अजब दावे करण्यात येत आहेत. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत. काश्मीर, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ढासळती अर्थव्यवस्था यावर देश-विदेशातून सुरु असणाऱ्या प्रतिक्रियेमुळे नरेंद्र मोदींचे मानसिक संतुलन बिघडलं आहे.
पाकचा पराभव करण्यासाठी 10 दिवससुद्धा लागणार नाहीत- मोदी
फवाद यांनी केलेलं ट्विट नरेंद्र मोदींच्या एका भाषणावर दिलेली प्रतिक्रिया होती. या भाषणात मोदी म्हणतात की, भारताचं सैन्य पाकिस्तानला ७ ते १० दिवसात हरवू शकतं. एनसीसीच्या कार्यक्रमात मोदींनी हे भाष्य केलं होतं. शेजारील देश तीनदा युद्धात पराभूत झालेला आहे. ते लोक छुपं युद्ध लढत आहेत. त्या शेजारील देशाचा पराभव करण्यासाठी 10 दिवससुद्धा लागणार नाहीत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या रॅलीला संबोधित केलं होतं.
दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी 'त्या' अधिकाऱ्याला मिळत होता वर्षाकाठी 'फिक्स पगार'
यापूर्वीही फवाद यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. मोदींच्या वाढदिवशी त्यांनी एक लाजीरवाणं ट्विट केले होतं. फवाद हुसेन यांनी #ModiBirthDay असं लिहित 'आजचा दिवस आपल्याला गर्भनिरोधकाचे महत्त्व स्पष्ट करतो अशी टीप्पणी केली होती.