ह्युस्टन : अमेरिकेच्या एक आठवड्याच्या दौऱ्यावर दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील तेल व गॅस क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. भारताची ऊर्जेची गरज पूर्ण करण्याच्या मुद्यावर यावेळी चर्चा झाली. जागतिक ऊर्जा कंपन्यांचे १७ मुख्य कार्यकारी अधिकारी यात सहभागी झाले. या कंपन्यांची उपस्थिती १५० देशांत आहे. या कंपन्यांचे एकूण मूल्य १००० अब्ज डॉलर आहे.मोदी यांनी टष्ट्वीट केले आहे की, ह्यूस्टनमध्ये येऊन ऊर्जा विषयावर चर्चा नाही, असे होणार नाही. ऊर्जा क्षेत्राच्या सीईओंसोबत चांगली चर्चा झाली. अमेरिकेतील नैसर्गिक गॅस कंपनी टेल्युरियन इंक आणि भारताच्या पेट्रोनेट एलएनजी कंपनीने एका करारावर स्वाक्षरी केली. त्यानुसार, भारताची पेट्रोनेट एलएनजी कंपनी आणि तिच्या सहायक शाखा अमेरिकेतून दरवर्षी ५० लाख टन नैसर्गिक गॅस (एलएनजी) आयात करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी टष्ट्वीट केले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी ह्यूस्टनमध्ये ऊर्जा क्षेत्राच्या सीईओंसोबत एक यशस्वी चर्चा केली आहे. पीएमओनेही याबाबतची काही छायाचित्रे टिष्ट्वटरवर शेअर केली. मोदी सरकारकडून अर्थव्यवस्थेत सुधारणांसाठी करण्यात आलेल्या उपायांचे अमेरिकी कंपन्यांच्या अधिकाºयांनी स्वागत केले. ‘एअर प्रोडक्टस्’चे सीईओ सैफी घासमी यांनी म्हटले आहे की, आम्ही काही सूचना केल्या आणि पंतप्रधान मोदी यांनी त्या अतिशय काळजीपूर्वक ऐकल्या. बाकर ह्यूसेज, बीपी पीएलसी, इमर्सन इलेक्ट्रिक कंपनी आदी कंपन्यांचे सीईओ या बैठकीत सहभागी झाले होते. (वृत्तसंस्था)
अमेरिकेतील ऊर्जा कंपन्यांच्या सीईओंसोबत मोदींची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 4:37 AM