शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शिखर संमेलनात मोदी-पुतीन चर्चा

By admin | Published: December 25, 2015 12:49 AM

प्रतिवर्षी होणाऱ्या भारत - रशिया शिखर संमेलनात गुरुवारी रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभयपक्षी संबंंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली.

मॉस्को : प्रतिवर्षी होणाऱ्या भारत - रशिया शिखर संमेलनात गुरुवारी रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभयपक्षी संबंंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत करण्यावर उभय नेत्यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून आज सोळाव्या भारत -रशिया शिखर संमेलनात उभय नेत्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. या बैठकीनंतर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. उभय नेत्यांनी क्रेमेलिनमध्ये प्रारंभी थेट चर्चा केली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टष्ट्वीट केले. भारत व रशिया यांचे उभयपक्षी संबंध जुने असून सन २००० पासून एकदा रशियात तर पुढच्या वेळी भारतात अशी द्विपक्षीय चर्चा होत असते. अध्यक्ष पुतीन यांनी काल रात्री मोदी यांच्या सन्मानार्थ मेजवानी दिली. त्यावेळी उभय नेत्यांमध्ये परस्पर हितांवर चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांचे मॉस्कोत चांगले स्वागत झाले. या दौऱ्यादरम्यान उभयपक्षी संरक्षण, अणुऊर्जा, हायड्रोकार्बन आदींबाबत द्विपक्षीय करार होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)अनेक करारांची शक्यताउभय देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातही करार होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील कुडनकूलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाच व सहाव्या संयंत्राच्या स्थापनेसाठी भारत जागा उपलब्ध करून देणार आहे. यावरही दोन्ही देशांत चर्चा अपेक्षित आहे. मोदी व पुतीन दुसऱ्यांदा भेटत आहेत. पंधराव्या शिखर बैैठकीसाठी पुतीन नवी दिल्लीत आले होते. उभय देशांमध्ये आता १० अब्ज डॉलर्सचा व्यापार असून येत्या दहा वर्षांत तो ३० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक व्हावा, असा दोन्ही देशांचा मानस आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राला मोदींची भेटमॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रशियाच्या मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट दिली. हे केंद्र आपत्कालीन स्थितीचा मुकाबला, तसेच विविध संबंधित संस्था, संघटनांत समन्वय राखण्याचे काम करते. मोदी जवळपास अर्धा तास केंद्रात होते. हे केंद्र एमरकोम या लघु नावानेही ओळखले जाते. या केंद्रातील विविध शाखांद्वारे सतत २४ तास काम करण्याबाबत माहिती दिली.> मोदींना मिळाली मौल्यवान भेटमॉस्को : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधी यांच्या डायरीतील एक हस्तलिखित पान आणि बंगालची १८ व्या शतकातील तलवार भेट दिली. मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मला बापूंच्या डायरीचे एक पान भेट दिले असून, त्यावर बापूंनी हातांनी लिहिलेल्या काही टिपण्या आहेत. याशिवाय पुतीन यांंनी बंगालची १८ व्या शतकातील तलवार भेट दिली. या तलवारीवर चांदीच्या तारांचे नक्षीकाम केलेले आहे. मी या अमूल्य भेटीबद्दल त्यांचे आभार मानतो. पुतीन यांनी क्रेमलीनमध्ये खासगी भेटीदरम्यान मोदींना या वस्तू भेट दिल्या. या भेटीदरम्यान उभय नेत्यांनी दोन्ही देशांच्या संयुक्त हिताशी संबंधित मुद्यावर चर्चा केली. (वृत्तसंस्था)