ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ८ - दहशतवाद आणि सायबर गुन्ह्यांचे देशासमोर मोठे आव्हान आहे. दहशतवादाला खपवून घेतले जाणार नाही, दहशतवाद्यांचा अड्डा भारताच्या शेजारीच आहे. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानला हाणला. ते अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामध्ये ते संबोधित करत होते. पुढे बोलताना ते म्हणाले दहशतवादाला पोसणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे. ज्यांचा मानतेवर विश्वास आहे, त्यांनी सोबत यावे आपण एकत्रितपणे दहशतवाद मोडून काढू.
विविधतेत एकता हे दोन्ही देशांचे समान सुत्र आहे, माझ्या सरकारसाठी संविधान हाच महान ग्रंथ आहे, अमेरिकेप्रमाणे भारतातही व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिले जाते असे मत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. अमेरिकन काँग्रेसने संसदेत भाषणासाठी निमंत्रित केल्याचे मोदींनी आभार मानले. अमेरिकिन संसदेत पहिल्यांच भाषण करत होते. अमेरिकी संसदेचे अध्यक्ष पॉल रायन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. मोदी संसदेत दाखल जाल्यानंतर त्यांचे टाळ्यांच्या कडकड्यात स्वागत केले.
अमेरिकन काँग्रेसमध्ये भाषण करणारे मोदी भारताचे सहावे पंतप्रधान आहेत. मोदी यांचा अमेरिका दौरा भरगच्च कार्यक्रमांनी व्यापलेला आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरुन मोदी अमेरिका दौ-यावर आले आहेत. काल स्वित्झर्लंड दौ-यावरुन मोदी अमेरिकन प्रमाणवेळेनुसार दुपारी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. स्वित्झर्लंड दौ-यात मोदींनी न्यूक्लियर सप्लायर ग्रुपमध्ये (एनएसजी) भारताच्या समावेशासाठी महत्वपूर्ण असलेला स्वित्झर्लंडचा पाठिंबा मिळवला. स्वित्झर्लंड एनएसजीचा सदस्य आहे.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे -
- कैपिटल हिल्स लोकतंत्रचे मंदिर आहे.
- अमेरिकन संसदेत भाषण करण्याची संधी मिळाली, हा माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर प्रत्येक भारतीयांचा आहे.
- अमेरिकेनं लोकशाही देशानां बळकट केलं.
- जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात माझा सन्मान, हा सव्वाशे करोड देशवासियांचा सन्मान आहे.
- माझ्या सरकारसाठी संविधान हाच महान ग्रंथ आहे.
- व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा नागरिकांचा मूलभूत अधिकार.
- महात्मा गांधींकडून अहिंसेची प्रेरणा मार्टिन ल्युथर किंग यांना मिळाली.
- स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणाचा मोदींकडून उल्लेख.
- अमेरिकन संविधानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मोठा प्रभाव.
- भारतीय संविधान निर्मिती करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान आहे.
- अमेरिकेने अडचणीच्या काळात वेऴोवेळी भारताला मदत केली.
- मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी अमेरिकेने केलेली मदत आम्ही विसरु शकत नाही.
- काळासोबत दोन्ही देशातील नातं मजबूत झालं.
- दोन्ही देशातील सैनिकांचं मानवतेसाठी बलिदान.
- अटल बिहारी वाजपेयी यांनी दोन्ही देशातील नातं नैसर्गिक असल्याचे म्हटले होते.
- विज्ञान, तंत्रज्ञानाच्या विकासामुऴे भारतात रोजगार निर्मिती.
- भारतीय योगाचा अमेरिकेवर मोठा प्रभाव आहे
- ३ कोटी अमेरिकन नागरिकांना योगाचा फायदा झाला.
- अमेरिकेत शास्त्रज्ञ, डॉक्टर, सीईओ आणि आंतराळवीर भारतीय असल्याचा अभिमान आहे.
- भारत १०० स्मार्ट शहरे बनविण्यासाठी कटिबद्ध आहोत.
- २०२२ पर्यंत भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल.
- भारत सध्या सामाजिक आणि आर्थिक बदलातून जातोय.
- २०२२ पर्यंत प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचविण्याचा आमचा मानस आहे.
- २१ व्या शतकात जितक्या संधी आल्या आहेत, तितकीच आव्हानं समोर आली आहेत.
- भारतीय उपखंडात सर्व आव्हानं पेलण्यासाठी भारत सक्षम आहे.
- दहशतवादाकडून संपूर्ण जगाला धोका आहे.
- दहशतवाद्यांचा अड्डा भारताशेजारी आहे.
- सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाचा सामना करणे गरजेचे आहे.
- दहशतवाद्याला कोणताही धर्म नाही.
- सायबर दहशतवाद सुद्धा वाढत चालला आहे.