Morari Bapu: गेल्या काही दिवसांपासून कथावाचक मोरारी बापू चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी देशभरातील बारा ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणी रामकथेचे वाचन केले. यानंतर आता त्यांनी थेट जगातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित विद्यापीठ असलेल्या केंब्रिज विद्यापीठात रामकथा सुरू केली आहे. 12 ऑगस्ट रोजी सुरू झालेली रामकथा 20 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
ऋषी सुनक यांची रामकथेला उपस्थितीकेंब्रिज विद्यापीठातील जीसस कॉलेजमध्ये रामकथा सुरू असून, काल 15 ऑगस्ट रोजी ब्रिटनचे पंतप्रधानऋषी सुनक यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जय श्री रामच्या घोषणाही दिल्या. या रामकथेसाठी मोठ्या प्रमाणावर अनिवासी भारतीय आणि स्थानिक लोकही सहभागी होत आहेत. यावेळी मोरारी बापू फक्त रामकथाच नाही तर जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करत आहेत.
रामकथेचे आयोजन कोणी केले?केंब्रिजमधील रामकथेचा हा कार्यक्रम ब्रिटनमधील तरुणांनी लॉर्ड डोलार यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, या तत्त्वावर रामकथेचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सर्व उपस्थितांना शाकाहारी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. कथा ही हिंदू परंपरा आणि केंब्रिज विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना दोन्ही देशांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख होईल.
ब्रिटनमध्ये पहिल्यांदा रामकथा कधी झालीब्रिटनमध्ये बापूंची पहिली कथा 1979 मध्ये झाली होती. 2017 मध्येही वेम्बली अरेना येथे कथेचे आयोजन करण्यात आले होते. आता सहा वर्षांनंतर बापू पुन्हा ब्रिटनमध्ये रामकथा करत आहेत. बर्याच वर्षांपूर्वी बापू पहिल्यांदा यूकेला रामकथा करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी अनिवासी भारतीयांना आपल्या मुलांना मातृभाषेची आणि देशाच्या संस्कृतीची ओळख करुन देण्याचा सल्ला दिला होता.