शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

अमेरिकेत एका दिवसात दीड लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 1:10 AM

२४ तासांत १,६८१ जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन :  कोरोना संसर्गाची स्थिती अमेरिकेत गंभीर होत चालली आहे. मागील २४ तासांत देशात १ लाख ६२ हजार ४२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे तेथील एकूण बाधितांची आकडेवारी दोन कोटी सात लाखांहून अधिक झाली आहे. तर, मागील २४ तासांमध्ये १ हजार ६८१ जणांचे मृत्यू झाले आहेत. 

न्यूयॉर्क, टेक्सास आणि कॅलिफोर्निया या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे ३८ हजार ५९९ जणांचा मृत्यू झाला तर,  टेक्सासमध्ये २८ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला. कॅलिफोर्नियातील २६ हजार ६६५ जणांना प्राण गमवावे लागले आहे. तर, फ्लोरिडामध्ये २२ हजार जणांचा मृत्यू झाला. 

कॅलिफोर्निया, कोलोराडो आणि फ्लोरिडा या राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. अमेरिकेत सध्या फायझर आणि मॉडर्नाच्या लसींना मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेत लसीकरणही सुरु आहे. 

लसीला मंजुरी...n    फायझरच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी जागतिक आरोग्य संघटनेने फायझर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीला मंजुरी दिली आहे.n    जागतिक आरोग्य संघटनेकडून पहिल्यांदाच एखाद्या लसीला मान्यता मिळाली आहे. यामुळे अनेक देशांना ही लस वापरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. n    याआधीच काही देशांनी फायझर-बायोएनटेकच्या लसीला मंजुरी दिली आहे. सध्या ही लस अमेरिका आणि युरोपमध्येच उपलब्ध आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या