इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तान सीमेवर गेल्या २ महिन्यांत केलेल्या लष्करी कारवाईत २५० पेक्षा अधिक अतिरेकी ठार झाल्याचा दावा केला आहे.‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ने म्हटले आहे की, पाकिस्तानची अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा अतिरेकी मुक्त करण्याची कारवाई चालूच राहणार आहे. या भागात ९ हजार फूट उंचीवरील सर्व टेकड्या अतिरेक्यांपासून मुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात गुरबाज, लताका, इंजरकास, मगरोतई यांचा समावेश आहे.एका सरकारी प्रवक्त्याचा हवाला देऊन डॉन वृत्तपत्राने या अतिरेकी तळावर मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारूगोळा सापडला आहे. कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर व सरकार तालिबान यांच्यातील शांतता चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर पाक सरकारने ही लष्करी कारवाई सुरू केली होती. या भागात अतिरेकी अफगाणिस्तानातून येतात आणि हिंसाचार करून परत जातात.
पाकिस्तानात दोन महिन्यांत २५० अतिरेकी ठार
By admin | Published: April 04, 2016 2:49 AM