वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोनामुळे एकाज दिवसात 2000 हून अधिक मृत्यूची नोंद होणारा अमेरिका हा जगातील पहिला देश ठरला आहे. यातच आता 40 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला असून तब्बल 1500 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
अमेरिकत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांमध्ये 17 जण केरळमधील, 10 जण गुजरातमधील, 4 जण पंजाबमधील, 2 जण आंध्र प्रदेशातील तर 1जण ओडिशातील आहे. यात अधिकांश लोक 60 वर्षांहून अधिक वय असलेले आहेत. एक एक जण 21 वर्षांचा आहे.
विविध समुदायांतील नेत्यांनी जारी केलेल्या एका यादीनुसार, न्यूजर्सी राज्यात 12 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. तर याच प्रकारे न्यूयॉर्कमध्ये 15, पेन्सिल्वेनिया आणि फ्लोरिडातही 4, तर टेक्सास आणि कॅलिफोर्नियामध्ये प्रत्येकी एका भारतीय-अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समजते.
न्यू यॉर्कमध्ये 1,000 हून अधिक भारतीय-अमेरिकन संक्रमित -याच बोरबर न्यूजर्सीमध्ये 400 हून अधिक आणि न्यू यॉर्कमध्ये 1,000 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यू यॉर्क शहरातील अनेक भारतीय-अमेरिकन टॅक्सी ड्रायव्हरचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. मृतांमध्ये, सुन्नोवा अॅनालिटिकल इंकचे सीईओ हनमंथ राव मारेपल्ली यांचाही समावश आहे. त्यांचा मृत्यू न्यूजर्सीतील एडिसनमध्ये झाला आहे. ते तेथे पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते.
जगात कोरोना बाधितांची संख्या 16 लाख 50 हजारहून अधिक -आतापर्यंत भारतासह संपूर्ण जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 लाख 50 हजारहून अधिक आहे. तर एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 लाख 68 हजार 668 लोक या आजारापासून बरे झाले आहेत. संपूर्ण जगाच्या तुलनेत इटलीमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत गेल्या 24 तासांत 2,108 लोकांचा मृत्यू झाला - अमेरिकेतही कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाखांहून अधिक आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जान्स हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत 2,108 लोकांचा मृत्यू झाला आहे.