न्यूयॉर्क : हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये भिन्न असतात. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून धोका टाळता येतो, असा दावा अमेरिकेच्या स्मिड्ट इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांच्या संशोधनात केला. आरोग्यविषयक नियतकालिक लॅन्सेटमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, ५०% लोकांना हृदयविकाराच्या २४ तास आधी लक्षणे दिसतात. डॉ. सुमीत चुग यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात असे आढळले की हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो, तर पुरुषांना छातीत दुखते. दोघांनाही धडधडणे आणि फ्लूसारखी लक्षणे जाणवतात.
अहवाल काय म्हणताे?हृदयविकाराचा झटका आलेल्या ९० टक्के लोकांचा हॉस्पिटलबाहेर मृत्यू होतो. कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांना आढळून आले आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्याच्या सवयींत गडबड, ताणतणाव वाढल्याने हृदयविकारही वाढले आहेत.
नेमका कुणाला? संशोधनानुसार, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका अधिक धोकादायक ठरू शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने धोका आणखी वाढतो. पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर पाच वर्षांच्या आत मृत्यू, हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका स्त्रियांमध्ये ४७% आढळून आला, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ३६% आहे. हृदयविकाराचा अचूक अंदाज येण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याचे सांगितले.
लक्षणे...पुरुष- छातीत दुखणे- अस्वस्थता- श्वास घेण्यास त्रास- डावा हात, जबडा दुखणे- मळमळ होणे
स्त्रिया- श्वास लागणे, घाम येणे- पाठ, मान, जबडा दुखणे- छातीत जळजळ - चक्कर येणे, मळमळ