वॉशिंग्टन : नजरेआड राहून आपले तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांत पसरविणारी हिज्ब उत तहरीर (हट) ही संघटना इसिसपेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकते. दक्षिण आशियातील या संघटनेचा प्रसार भारतासाठी धोकादायक ठरू शकतो, असे एका अहवालात म्हटले आहे. सीटीएक्स नियतकालिकाच्या ताज्या अंकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. इसिस संघटना इराक व सिरियात असून, तिच्या क्रूरता व नृशंसतेच्या कथा प्रसारमाध्यमातून जनतेसमोर येतात; पण हट संघटना अगदी गुपचूप काम करीत आहे. या संघटनेत जगातील दहा लाख लोक आहेत. हटची एक शाखा म्हणून हरकत उल मुहोजिरनफी ब्रिटानिया ही संघटना कार्यरत असून, या संघटनेच्या सदस्यांना जैविक व रासायनिक युद्धाचे प्रशिक्षण दिले जात आहे. दक्षिण आशियात हट संघटना पाक व बांगलादेशात आहे. या संघटनेची स्थापना १९५२ साली जेरुसलेम येथे करण्यात आली असून, तिचे मुख्य कार्यालय लंडन येथे आहे. त्याच्या शाखा मध्य आशिया, युरोप, दक्षिण आशिया व इंडोनेशियात आहेत. हटने भारतातही पाय ठेवला आहे; पण भारतात या संघटनेची चलती नाही. पाक-बांगलादेशात मात्र संस्थेचे बस्तान बसले आहे. इस्रायलविरोधात दिल्लीतील बाटला हाऊस येथे २०१० साली संघटनेने निदर्शने केली होती.
इसिसपेक्षा अधिक भयंकर हिज्ब उत तहरीर
By admin | Published: February 15, 2015 11:39 PM