अंतराळातील अनेक ग्रहांवर पाणी असल्याचा दावा नेहमीच करण्यात येतो. या दाव्यांमध्ये सांगितलं जातं की, पृथ्वीशिवाय इतरही काही ग्रहांवर पाणी आहे. या दाव्यांचं सत्य जाणून घेण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक शोध घेत आहेत. वैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या एका नव्या रिसर्चमधून आश्चर्यकारक खुलासा झाला आहे. सौरमंडळातील ७वा ग्रह यूरेनस आहे. याच्या दोन सर्वात मोठ्या चंद्राच्या पृष्ठभागात समुद्र असू शकतो.
एका रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांनी आपल्या खुलाशात सांगितलं की, जर दोन्ही चंद्राच्या आउटर शेलमधून गरमी बाहेर येत असेल तर दोन्ही चंद्रांवर महासागर असू शकतो. यूनिव्हर्सिटी कॅलिफोर्नियामधील रिसर्चचे लेखक फ्रान्सिस निम्मो यांनी हा मोठा दावा केला आहे आणि त्यांनी त्यांचा दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, ते पैज लावून सांगू शकता की, दोन्ही चंद्रावर समुद्र आहे. हे कोणतंही आश्चर्य नाही.
यूरेनस एक ५० हजार किमी मोठा ग्रह आहे. ज्याला आइस जाएंट असंही म्हटलं जातं. याचा सर्वात मोठा चंद्र टायटेनिया आहे ज्याचा व्यास साधारण १,५७६ किमी आहे, तर दुसरा चंद्र ओबेरॉनबाबत सांगायचं तर त्याचा व्यास १,५२२ किमी आहे. या दोन्ही चंद्राच्या पृष्ठभागाचं तापमान २०० डिग्री सेल्सीअसच्या जवळपास राहतं.
शोधात असाही दावा करण्यात आला आहे की, दोन्ही चंद्र आपल्या आत खोलात रेडिओधर्मी तत्व काही अंतर्गत पाणी वितळवून जमा करू शकतात. यूरेनसच्या जास्तीत जास्त अनेक छोट्या चंद्रांना आंतरिक उष्णता प्राप्त होते. यांना टायटेनिया आणि ओबेरॉनच्या तुलनेत अधिक उष्णता मिळते.
टायटेनिया आणि ओबेरॉन आणि दूर असलेल्या चंद्रांच्या पृष्ठभागाखाली गोठलेला बर्फ ज्वारीय ताप वितळवू शकत नाही. कारण यासाठी केवळ हे पुरेसं नाही.
वैज्ञानिक २०३० च्या दशकात एक अंतराळ मोहिम करण्याची तयारी करत आहे. या मोहिमेचं नेतृत्व नासा करत आहे. यात यूरेनस आणि त्याच्या आजूबाजूच्या ग्रहांची-उपग्रहांची माहिती मिळवली जाणार आहे.