वॉशिंग्टन : जगभरात कोरोना साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे तर या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३० लाखांहून अधिक झाली. सर्वाधिक बळी अमेरिकेत असून त्यांची संख्या २ लाखांहून अधिक आहे. त्यानंतर ब्राझिलमध्ये १ लाख ४१ हजार, भारतात ९५,५४२, मेक्सिकोत ७६,४३०, ब्रिटनमध्ये ४१,९८८ इतकी बळींची संख्या आहे. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले असून काही देशांतील संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला.
महाराष्ट्रात गेल्या पंधरवड्यापासून दररोज २० ते २५ हजारांदरम्यान नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडत असताना सोमवारी हा आकडा ११ हजार ९२१ वर आला आहे. आॅक्टोबर हिटची चाहूल लागली असताना संसर्गबाधितांची संख्या कमालीची घटल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरच्या अखेरीस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील जवळपास १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ५१ हजार १५३ झालीअसून दिवसभरात १८० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २ लाख ६५ हजार ३३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात सर्वाधिक प्रमाण पुण्यातील रुग्णांचे असून ही संख्या ५७ हजार ३१० इतकी आहे.मुंबईत २ लाख कोरोनाबाधितच्मुंबईत सोमवारी २ हजार ५५ रुग्ण आणि ४० मृत्युंची नोंद झाली आहे. त्यामुळे शहर-उपनगरात २ लाख ९०१ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, बळींचा आकडा ८ हजार ८३४ झाला आहे.च्मुंबईत आतापर्यंत १ लाख ६४ हजार ८८२ रुग्ण कोविडमुक्त झाले असून, सध्या २६ हजार ७८४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत अन्य कारणांमुळे ४०१ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.