कैरो : इजिप्तचे माजी अध्यक्ष व मुस्लिम ब्रदरहूड पक्षाचे नेते मोहम्मद मोर्सी यांना निदर्शकांच्या हत्येच्या आरोपाखाली २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निवडून आलेल्या नेत्याला शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कैरो येथील गुन्हेगारी न्यायालयाने हा निकाल दिला असून ६३ वर्षांच्या मोर्सी यांच्यासह मुस्लिम ब्रदरहूडच्या आणखी १२ नेत्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. मोर्सी यांच्यावरील खुनाचा आरोप वगळला असून, बळाचा वापर व अनेकाना तुरुंगात टाकण्याच्या आरोपासाठी ही शिक्षा आहे असे स्पष्ट केले आहे.
मोर्सी यांना २० वर्षांचा कारावास
By admin | Published: April 22, 2015 2:43 AM