जगावर अजून एका युद्धाचे सावट; किम जोंगने दक्षिण कोरियाच्या सीमेवर पाठवली 180 लढाऊ विमाने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 05:18 PM2022-11-04T17:18:06+5:302022-11-04T17:19:06+5:30

गेल्या तीन दिवसांत उत्तर कोरियाने किमान 80 क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत.

Morth Korea vs South Korea: Another war on the world; Kim Jong sent 180 fighter jets to the border of South Korea | जगावर अजून एका युद्धाचे सावट; किम जोंगने दक्षिण कोरियाच्या सीमेवर पाठवली 180 लढाऊ विमाने

जगावर अजून एका युद्धाचे सावट; किम जोंगने दक्षिण कोरियाच्या सीमेवर पाठवली 180 लढाऊ विमाने

googlenewsNext

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने जगाचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. अशात जगावर आणखी एका युद्धाचे सावट आहे. हे युद्ध दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यात होऊ शकते. दोन्ही देश पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले की, उत्तर कोरियाने सीमेवर सुमारे 180 लढाऊ विमाने पाठवली आहेत. दक्षिण कोरियानेही आपल्या लढाऊ विमानांना अलर्टवर ठेवले आहे. 

दक्षिण कोरियाला उत्तरची धमकी
उत्तर कोरियाला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने F-35A स्टेल्थ फायटरसह 80 विमाने सीमेवर पाठवली आहेत. सैन्याने सांगितले की, अमेरिकेसोबत व्हिजिलेंट स्टॉर्म हवाई अभ्यासात भाग घेण्यासाठी दक्षिण कोरियाचे 240 विमाने गेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किम जोंग उन याच अभ्यासाच्या विरोधात असून, यामुळे दक्षिण कोरियाला धमकी देत आहेत.

दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव
किम जोंग उनने दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ आपली विमाने पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाची 10 युद्ध विमाने सीमेजवळ आली होती, त्यानंतर दक्षिण कोरियालाही आपली विमाने पाठवावी लागली. किम जोंग उन एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्राच्या चाचण्या करत असताना उत्तर कोरियाची विमाने दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ उडत आहेत. 

उत्तर कोरियाने 80 क्षेपणास्त्रे डागली
उत्तर कोरियाने गुरुवारी समुद्रात आणखी एक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा जपानने केला असून, एका दिवसात त्यांनी किमान चार क्षेपणास्त्रे डागली आहेत. गेल्या तीन दिवसांत किमान 80 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि दक्षिण कोरियाने मोठ्या प्रमाणात हवाई सराव करण्याची घोषणा केली. उत्तर कोरियाने प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी रात्री ही चाचणी घेण्यात आली.

उत्तर कोरियाची रशियाला मदत: व्हाईट हाऊस
युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाने मोठ्या प्रमाणात तोफखाना पुरवल्याचा आरोप अमेरिकेने बुधवारी केला. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, अमेरिकेचा असा विश्वास आहे की, उत्तर कोरिया शस्त्रांना मध्य पूर्व किंवा उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये पाठण्याचे भासवत आहे, पण हा दारुगोळा रशियाकडे जात आहे. 

Web Title: Morth Korea vs South Korea: Another war on the world; Kim Jong sent 180 fighter jets to the border of South Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.