पेशावर : पेशावरच्या वायव्येकडील आदिवासीबहुल भागातील मशिदीमध्ये मानवी बॉम्बने स्फोट घडवून आणला. त्यात २५ जण ठार झाले असून, २९ जण गंभीर जखमी झाले आहे. स्वत:च्या शरीरात दडवून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यापूर्वी त्या इसमाने ‘अल्ला हो अकबर’ असे नारेही दिले. अफगाणिस्तानला लागून असलेल्या अनबीर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या मशिदीत शुक्रवारी दुपारी २ वाजता नमाज पढला जात असतानाच हा आत्मघाती हल्ला झाला. बॉम्बस्फोटामुळे जमलेल्या लोकांची धावपळ झाली. प्रत्येक जण मशिदीतून बाहेर पडू लागल्याने चेंगराचेंगरीही झाली. (वृत्तसंस्था)
मशिदीत बॉम्बस्फोट; २५ ठार
By admin | Published: September 17, 2016 4:13 AM