शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफची गोळ्या घालून हत्या; पठाणकोट हल्ल्याचा होता मास्टरमाईंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 12:04 PM

भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफ याची पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. शाहीद पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.

भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. शाहिद पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. एनआयएने शाहिदविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो भारत सरकारच्या यादीत असलेला दहशतवादी होता. 

मोठी बातमी! नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार

शाहिद तालिफ हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथील रहिवासी होता. तो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो सियालकोट सेक्टरचा कमांडर होता, तो भारतात दहशतवाद्यांच्या प्रवेशावर लक्ष ठेवत होता आणि दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होता. शाहिद लतीफला १२ नोव्हेंबर १९९४ रोजी अटक करण्यात आली आणि १६ वर्षे भारतीय तुरुंगात राहिल्यानंतर २०१० मध्ये वाघा मार्गे हद्दपार करण्यात आले.

२ जानेवारी २०१६ रोजी पंजाबमधील पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याचा शाहीद लतीफ हा मास्टरमाईंड होता. याशिवाय इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केल्याच्या प्रकरणातही शाहिद आरोपी होता.

२०१६ मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कराचे सात जवान शहीद झाले होते. पठाणकोट एअरफोर्स स्टेशन सीमेजवळ आहे. या ठिकाणी मोठी शस्त्रे ठेवली जातात. युद्धाच्या बाबतीत, संपूर्ण रणनीती येथूनच अंमलात आणली जाते. १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही या हवाई दलाच्या स्टेशनने मोठी भूमिका बजावली होती. मिग-21 लढाऊ विमानांसाठी हे बेस स्टेशन आहे. 

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी बशीर अहमद पीर उर्फ ​​इम्तियाज आलम याची पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. हिजबुल मुजाहिद्दीनचा लॉन्चिंग कमांडर बशीर अहमद पीर उर्फ ​​इम्तियाज आलम याचा रावळपिंडीत गोळ्या घालून खात्मा करण्यात आला. गेल्या वर्षीच भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले होते. रावळपिंडीत बसून तो जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रसद आणि इतर साधनसामुग्री पुरवत होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान