शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

मदर तेरेसांना संतपद बहाल !

By admin | Published: September 05, 2016 6:09 AM

दीनदुबळे, निराधारांसाठी काम करून जगात आदर प्राप्त केलेल्या मदर तेरेसा यांना ‘संत मदर तेरेसा’ असे म्हणण्यात कदाचित आम्हाला अवघडल्यासारखे होईल.

व्हॅटिकन सिटी : दीनदुबळे, निराधारांसाठी काम करून जगात आदर प्राप्त केलेल्या मदर तेरेसा यांना ‘संत मदर तेरेसा’ असे म्हणण्यात कदाचित आम्हाला अवघडल्यासारखे होईल. त्यांचे संतत्व आमच्याजवळ आहे, त्यांचा प्रेमळपणा एवढा सफल आहे की, आम्ही त्यांना नेहमीच मदर (आई) हाक मारतो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत, पोप फ्रान्सिस यांनी ‘भारतरत्न’ मदर तेरेसा यांना संतपद बहाल केले. भारताला आतापर्यंत मिळालेले हे पाचवे संतपद आहे. सेंट पीटर स्क्वेअरमध्ये पोप फ्रान्सिस यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला एक लाखांहून अधिक लोक आणि वेगवेगळ््या देशांचे १३ प्रमुख उपस्थित होते. तेरेसा यांच्या मिशनरीज आॅफ चॅरिटीजच्या साडी नेसलेल्या शेकडो नन्सही उपस्थित होत्या. लॅटिन भाषेत पोप फ्रान्सिस म्हणाले की, ‘आम्ही कोलकाताच्या मदर तेरेसा या संत असल्याचे जाहीर व स्पष्ट करतो व त्यांचा संतांमध्ये समावेश करतो. संपूर्ण जगाने त्यांच्याबद्दल त्या संत असल्याचा पूज्यभाव बाळगावा, असेही सांगतो.’ ‘मदर नेहमी म्हणायच्या की, मी गरिबांची भाषा बोलू शकणार नाही कदाचित, परंतु मी स्मित करू शकते,’ असे पोप म्हणाले. मदरचे हास्य आम्ही आमच्या हृदयात जपून ठेवू व ते आमच्या प्रवासात जे भेटतील विशेषत: जे पीडित आहेत त्यांना देऊ. गर्भपाताला मदरच्या असलेल्या विरोधाची आठवण पोप यांनी आपल्या प्रवचनात करून दिली. १९७९ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर तेरेसांनी आपल्या भाषणात गर्भपात म्हणजे ‘आईने केलेला खून’ असे वादग्रस्त विधान केले होते. त्या नेहमी म्हणायच्या की जो जन्माला आलेला नाही तो दुबळा आहे, असेही पोप म्हणाले. ही सभा झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी खुल्या जीपमधून सेंट पीटर स्क्वेअरभोवती फेरी मारली.मदर तेरेसा यांनी चार दशके गरिबातल्या गरिबांची सेवा केली. त्यांच्या या सेवेमुळे त्या पृथ्वीवरील अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती बनल्या. तेरेसांना १९७९ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते. स्वार्थत्याग आणि कल्याण या ख्रिश्चन मूल्यांचे मदर तेरेसा या जगभर प्रतिकच बनल्या होत्या. १९९७ मध्ये कोलकातामध्ये त्यांचे निधन झाले. (वृत्तसंस्था)>भारतातल्या पाचव्या संतख्रिस्ती धर्मात इ.स.१२०० पासून ‘संत’पद देण्याची परंपरा सुरू झाली असून, आतापर्र्यंत सुमारे १५० विभूतींना संतपद बहाल करण्यात आले. त्यात पाच भारतीयांचा समावेश आहे. वसई येथील धर्मगुरू गोन्सालो गार्सिया (१८६२) केरळच्या सिस्टर अल्फोन्सा (२००८)मलबारचे धर्मगुरू कुरुयाकोसे एलियास चावरा (२००४), त्रिसूर येथील सिस्टर युफरासिया (२०१४) कोलकाता येथील मदर तेरेसा (२०१६) >भारताच्या मंत्र्यांसह १२ जण उपस्थितपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या समारंभासाठी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यासोबत १२ जण आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे.>टपाल तिकीट : टपाल खात्याने रविवारी मुंबईत मदत तेरेसा यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. दूरसंचार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास बिशप जेलो ग्राशियस, सिस्टर रुबेला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. >अभिमानाची बाब : मोदीहँगझोवू : मदर तेरेसा यांना रविवारी बहाल करण्यात आलेले संतपद हा ‘संस्मरणीय व अभिमानास्पद क्षण’ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. ते येथे जी-२० शिखर परिषदेला आले आहेत. संत मदर तेरेसा मार्गभुवनेश्वर : मदर तेरेसा यांना संतपद जाहीर झाल्यानंतर रविवारी येथील मुख्य रस्त्याचे नामकरण ‘संत मदर तेरेसा मार्ग’ असे करण्यात आले. हा मार्ग सत्य नगर आणि कटक-पुरी महामार्ग आहे. तो मदरच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी म्हटले.