आपल्या सहा वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर एका आईने खास पोस्ट लिहिली आहे. तो गेला पण मी खूश आहे कारण...' असं म्हणत तिने भावना सर्वांसोबत शेअर केल्या आहेत. आपल्या लेकाच्या मृत्यूनंतर आपण खूश असल्याचं महिलेने टिकटॉकवर म्हटलं आहे. व्हिटनी फ्रॉस्ट असं या महिलेचं नाव असून तिने आपल्या मुलाच्या फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर मी आनंदी आहे कारण आता त्याला जास्त त्रास सहन करावा लागणार नाही असं तिने म्हटलं आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिटनीचे टिकटॉकवर तब्बल 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
व्हि़टनीचा सहा वर्षीय मुलगा हेरिसन हा इन्फँटाइल न्यूरोएक्सोनल डिस्ट्रोफीने (INAD) त्रस्त होता. त्याच्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्याच्या आरोग्यावर काहीच परिणाम होत नव्हता. प्रकृतीत सुधारणाच होत नव्हती. "हेरिसनने जगाचा निरोप घेतला. तो खूप लवकर निघून गेला. त्यामुळेच त्याला खूप जास्त त्रास झाला नाही" असं तिने म्हटलं आहे. तसेच "हेरिसन असा प्रकारे निघून गेल्याने आम्ही सारेच खचून गेले आहोत. आतून तुटलो आहोत. पण त्याला आता जास्त त्रास होणार नाही याचा आम्हाला आनंद आहे" असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"आमचा मुलगा या जगात नाही यावर विश्वासच बसत नाही"
काही दिवसांपूर्वी व्हिटनीने हेरिसनची तब्येत ही आधीच्या तुलनेत बरी असल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतर पुन्हा त्याची तब्येत बिघडली आणि मृत्यू झाला. "आमचा मुलगा या जगात नाही यावर अजूनही आमचा विश्वासच बसत नाही. तो आमच्यासोबत होता तो प्रत्येक क्षण आम्ही आठवत आहोत आणि आनंदी राहत आहोत. मी माझ्या आयुष्यात इतका जास्त आनंदी राहणारा मुलगा कधीच पाहिला नव्हता" असं देखील आपल्या टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. आम्हाला आणखी दोन मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी आता आम्हाला आणखी स्ट्रॉग होण्याची गरज असल्याचं देखील तिने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.