अमेरिकेतील मिसोरीमध्ये एका महिलेने कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी असे काम केले, जे ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. खरं तर, ४८ वर्षीय लॉरा ओगलेस्बेने स्वतःच्या मुलीचे ओळखपत्र चोरून केवळ महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही. उलट या ओळखपत्राच्या मदतीने लाखो रुपयांचे कर्ज घेतले. तसेच कॉलेजच्या अनेक तरुण मुलांसोबत डेट केले.'न्यूयॉर्क पोस्ट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आरोपी लॉरा ओगलेस्बेने हिने कट रचून हे कृत्य केले आहे. यासाठी तिने आपल्या जवळच्यांनाही फसवले. २०१६ मध्ये लॉराने हे सर्व करायला सुरुवात केली आणि हे तिचे कृत्य दोन वर्षे चालू राहिले. मात्र, या महिलेची फसवणूक अखेर पकडण्यात आली. त्यानंतर तिला १९ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरा नावाच्या या महिलेने आपल्या मुलीचे ओळखपत्र चोरले आणि साउथ वेस्ट बेपिस्ट यूनिवर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. यासाठी महिलेने मुलीचे सोशल सिक्युरिटी कार्ड देखील वापरले होते. एवढेच नाही तर या महिलेने आपल्या मुलीच्या नावे ड्रायव्हिंग लायसन्सही घेतले.कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर, लॉरा ओगलेस्बेने एका २० वर्षाच्या मुलाशी डेटिंग सुरू केली. महिलेने तिचे वय २२ वर्षे असल्याचे सांगितले. यानंतर लॉराने स्नॅपचॅटवर तिच्या मुलीच्या नावाने बनावट खातेही तयार केले. इतकंच नाही तर तिने आपल्या मुलीसारखं वेषभूषाही करायला सुरुवात केली. लॉरा तरुण मुलांना डेट करण्यासाठी खूप मेकअपचा करत असे.
पकडले जाण्यापूर्वी लॉरा एका जोडप्यासोबत माउंटन व्ह्यूमध्ये राहत होती. तिने दोघांनाही आपल्या जाळ्यात ओढले होते. महिलेने या जोडप्याला सांगितले की, ती एका वाईट संबंधातून बाहेर पडली आहे.