ऑनलाइन लोकमतमिसिसिपी, दि. 12 - एका 12 वर्षांच्या मुलीने आपल्या आईची प्रसूती केल्याची घटना अमेरिकेमध्ये घडली आहे. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. दक्षिण अमेरिकेतील मिसिसिपी राज्यात ही घटना घडली आहे. मुलीला प्रसूती करण्यासाठी डॉक्टरांनी मदत केली. डॉक्टरांनी जेसी डेलापेना या बारा वर्षांच्या मुलीला आपल्या आईची प्रसूती करणार का? असे विचारले. त्यावेळी डेलापेनाने लगेच हो म्हटले. मिसिसिपीमधील बेपटिस्ट रुग्णालयात डेलापेनाने आपल्या आईची प्रसूती केली. त्या बारा वर्षांच्या मुलीची आई डेद केरावेने ही माहिती दिली. डेद केरावेनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, डॉक्टर वाल्टर वुल्फ ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनची तयारी करत होते. त्यावेळी त्यांना असे दिसले की जेसी डेलापेना आपल्या आईची मदत करु इच्छिते. त्यावेळी डॉक्टरांनी तिला प्रसूती करते का? छोट्या बाळाला हातात घेऊ इच्छिते का ? विचारले. त्यावेळी मुलीने सकारात्मक प्रतिसाद दिला. माझ्या मुलीला डॉक्टर होण्याची इच्छा होती.
आणखी वाचा : आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे 35 वर्ष तुरुंगवास
जेसी डेलापेना स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगते की, आमच्या कुटुंबात हे शेवटच्या बाळाचा जन्म होणार होता. त्यामुळे आई-वडिलांनी मला प्रसूती करण्याची परवानगी दिली. मला डॉक्टरांनी विचारल्यावर लगेच हो म्हटले. त्यानंतर मला ऑपरेशन करतेवेळी घालण्यात येणारा ड्रेस देण्यात आला. ऑपरेशन करतेवेळी मला डॉक्टर वुल्फ जेसीने सूचना दिल्या. त्यांच्या सहकार्यामुळे मी हे काम करू शकले. त्यादरम्यान माझ्या वडिलांनी हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला. ज्यावेळी आपल्या लहान भावाला तिने पाहिले त्यावेळी तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले.
आणखी वाचा : कुत्र्याने गमावली शाही नोकरी
डेलापेनाचे वडील जैकने हा व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत आनंद साजरा केला. त्यावेळी त्यांनी असे कॅप्शन लिहिले की, माझ्याजवळ जगातील सर्वात उत्कृष्ट डॉक्टर आहे. जैकच्या फेसबुक पोस्टनंतर जेसी डेलापेना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
आणखी वाचा : पियानो वाजवणाऱ्या कोंबडीने मिळवली वाहवा