शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

चिलीत वाढताहेत फॅशनेबल 'कपड्यांचे डोंगर'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 5:43 AM

दरवर्षी २९००० टन नवीन, कुठेही विकले न गेलेले कपडे असे चिलीच्या अटाकामा वाळवंटात टाकून दिले जातात. एक टन म्हणजे १००० किलो. असा विचार केला तर हे कपडे किती प्रचंड जागा व्यापत असतील हे लक्षात येऊ शकतं.

ठळक मुद्देबाजारपेठेत हे सगळे कपडे विकले जाऊ शकत नाहीत. असे कुठेच विकले न गेलेले कपडे मग चिलीच्या वाळवंटात टाकून दिले जातात. असे फेकून दिलेले हे कपडे असतात तरी किती? 

अन्न-वस्त्र-निवारा या खरं पाहिलं तर मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पण नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर या तीनही बाबी मूलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन माणसाच्या आयुष्याचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. त्याचा अतिरेक होत आहे. आपल्या गरजेपेक्षा जास्त वापरण्याची हाव निर्माण झाली आहे. त्यामुळे पराकोटीची विषमता उदयाला आली आहे. पण त्यातही अतिशय भयंकर परिस्थिती वस्त्रांच्या अतिरेकाने निर्माण होत आहे आणि ती केवळ अतिरेक करणाऱ्यांच्या आयुष्यात निर्माण होत नसून त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. सातत्यानं कपडे खरेदी करायचे आणि ते वापरून किंवा न वापरता, थोडेसेच वापरून फेकून द्यायचे, ही जणू नवी संस्कृती निर्माण झाली आहे. कपडे उर्फ फॅशन ही त्यातल्या त्यात सहज परवडण्याजोगी चैन असल्यामुळे जगाच्या पाठीवरची खूप मोठी लोकसंख्या सातत्याने मोठ्या प्रमाणावर कपडे खरेदी करत असते. त्यातही युरोप आणि अमेरिकेत सतत बदलणाऱ्या फॅशनच्या कपड्यांचं मार्केट खूप मोठं आहे.

फास्ट फॅशनसाठीचे हे कपडे प्रामुख्याने चीन आणि बांगलादेशात तयार केले जातात. तिथून हे कपडे युरोप आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत पाठवले जातात. एजन्सी फ्रान्स प्रेस यांच्या निरीक्षणानुसार तिथे जे कपडे विकले जात नाहीत ते ५९००० टन कपडे चिली देशाच्या इकिक बंदरात दरवर्षी आणले जातात. तिथून हे कपडे लॅटिन अमेरिकन देशांमध्ये म्हणजे मुख्यतः दक्षिण अमेरिका खंडात विकायला पाठवले जातात. परंतु त्याही बाजारपेठेत हे सगळे कपडे विकले जाऊ शकत नाहीत. असे कुठेच विकले न गेलेले कपडे मग चिलीच्या वाळवंटात टाकून दिले जातात. असे फेकून दिलेले हे कपडे असतात तरी किती? 

दरवर्षी २९००० टन नवीन, कुठेही विकले न गेलेले कपडे असे चिलीच्या अटाकामा वाळवंटात टाकून दिले जातात. एक टन म्हणजे १००० किलो. असा विचार केला तर हे कपडे किती प्रचंड जागा व्यापत असतील हे लक्षात येऊ शकतं. चिली देशात असलेल्या वाळवंटाचा कितीतरी भाग आता या टाकून दिलेल्या कपड्यांनी व्यापला आहे.  वाळवंटात या कपड्यांची नीट विल्हेवाट न लावता ते असे का टाकून दिले जातात? तर हे कपडे तयार करतांना त्यात हानिकारक रसायनं वापरलेली असतात आणि त्या कपड्यांचं जैव विघटन होऊ शकत नाही. म्हणजेच त्यावर प्रक्रिया करून त्याचं खत तयार करणं किंवा ते मातीत मिसळून टाकणं असं काही करता येऊ शकत नाही. त्यामुळे कुठल्याही महानगरपालिकेचा कचरा डेपो हे कपडे आपल्या हद्दीत येऊ देत नाही.याचाच अर्थ असा की, हे टाकून दिलेले कपडे पुढील कित्येक वर्षं तसेच त्या वाळवंटात पडून राहणार आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी व्यापलेली जागाही उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. कडक उन्हाने हे कपडे कालौघात खराब होतील, त्यांच्या चिंध्या होतील, त्यांचे अगदी बारीक कण होतील, पण ते कधीही खऱ्या अर्थाने मातीत मिसळणार नाहीत. फॅशन उद्योगाने पर्यावरणाचा कसा आणि किती नाश होतोय याचं हे एक उदाहरण आहे. पण तरीही फॅशन उद्योगाने केलेल्या एकूण नुकसानात याचा वाटा तसा कमी आहे.

फॅशन उद्योगामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा एकूण जागतिक उत्सर्जनातील वाटा ८ ते १० टक्के आहे असं संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे. २०१८ साली असं लक्षात आलं होतं, की जगभरातील हवाईमार्ग आणि समुद्रीमार्गावरील एकूण वाहतुकीने एकत्रितपणे जेवढी ऊर्जा वापरली त्याहून जास्त ऊर्जा एकट्या फॅशन उद्योगात वापरली जाते. ब्रिटनमधील ॲलन मॅकआर्थर फाऊंडेशनच्या अभ्यासानुसार २००४ ते २०१९ या काळात कपड्यांचं उत्पादन दुप्पट झालं आहे. २००० सालापेक्षा २०१४ साली ग्राहक कपड्यांची खरेदी ६० टक्के जास्त करत होते. आणि अर्थातच त्यात तयार झालेल्या, वापरल्या गेलेल्या आणि न वापरल्या गेलेल्या प्रत्येक कपड्याने पर्यावरणाचा काहीतरी लचका तोडलेलाच आहे.

हौस आणि चैन कमी होणार का?फॅशन इंडस्ट्रीला आर्थिक फायदा करून देण्यासाठी आपण दुहेरी किंमत मोजतोय. पैसेही देतोय आणि पर्यावरणाचं नुकसानाही करतोय. त्यातला खरा दैवदुर्विलास हा आहे की ही किंमत जगातला प्रत्येक माणूस मोजतो आहे, मोजणार आहे. ज्याला अंग झाकायला पुरेसे कपडे मिळत नाहीत अशीही माणसं या अतिरिक्त कपड्यांच्या उत्पादनाची किंमत मोजणार आहेत. पण उपभोगाची ही अधिकाधिक वेगाने फिरणारी चक्रं थांबवणं आणि उलटी फिरवणं हे सोपं नाही. कारण त्यासाठी गरज, हौस आणि चैन यातल्या सीमारेषा नव्याने आखण्याची गरज आहे. माणसांनी खरेदी कमी केली तर उत्पादन कमी करावंच लागतं. प्रश्न असा आहे, की माणसं स्वतःच्या गरजा कमी करतील का? हौस तरी कमी करतील का? किमान हौस भागल्यानंतरची चैन तरी कमी करतील का? आणि त्याहून मोठा प्रश्न हा आहे, की ती चैन कमी न करण्याची चैन माणसांना आता परवडणार आहे का?

टॅग्स :fashionफॅशन