आपल्याला समुद्र अथवा महासागरांसंदर्भात फार मर्यादित माहिती आहे. मात्र अवकाशा प्रमाणेच समुद्राच्या गर्भातही अनेक रहस्ये दडलेली आहेत. आता जपानसंदर्भात एक विशेष घटना घडली आहे. जपान हा प्रशांत महासागरातील एक सागरी देश आहे. या देशाला समुद्राने सर्वबाजूंनी वेढलेले आहे. समुद्रातील सर्व लहान मोठ्या हालचालिंचा प्रभाव जपानवर होत असतो. जपानला भूकंपाचा धक्का बसला की त्सुनामीचा धोका वाढतो. अर्थात विध्वंस होण्याची शक्यता वाढते. मात्र, समुद्रातील हालचालींमुळे विध्वंसच होतो, असे नाही. तर अनेक वेळा सुद्राच्या गर्भातून अनमोल खजिनाही बाहेर पडतो. यावेळी निसर्गाने जपानला एक मोठे गिफ्ट दिले आहे. राजधानी टोकियोपासून 1200 किमी अंतरावर इव्हो जिमाजवळ एका नव्या बेटाचा जन्म झाला आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या उद्रेकात उंच लाटा उसळल्या. अगदी त्सुनामी आल्यासारखे वाटले. मात्र, या लाटा पुन्हा समुद्रातच विलीन झाल्या. या घटनेत, जमिनीचा एक भाग वर आला. यामुळे, जपानला आणखी एक जमिनीचा भाग जोडला गेला आहे. इव्हो किनार्यापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर हे नवे बेट अस्तित्वात आले आहे.
इव्हा कोस्टजवळ समुद्रात ज्वालामुखीमध्ये स्फोट होत आहेत. यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणावर लाव्हा पसरला असून एखाद्या बेटाप्रमाणे दिसत आहे. या बेटाचा घेर जवळफास 100 मीटर आणि उंची जवळपास 20 मीटर एवढी आहे.
यामुळे विशेष आहे नवे बेट -टोकियो विद्यापीठाच्या संशोधकांनी एका निवेदनात म्हटले आहे, या स्फोटांमुळे समुद्राची पृष्ठभाग किमान दोन ठिकाणी तुटला आहे. हा स्फोट इव्हो जीमाच्या दक्षिणेला झाला होता. शोधकांच्या मते, येथे येत असलेल्या रंगीत पाण्यावरून समजते की, येथे मॅग्मा फूटत आहे. या बेटावर डोंगराचा एक पॅटर्न तयार झाला आहे. मात्र खड्यांचा कुठल्याही प्रकारचा संकेत नाही. द जापान टाइम्सने दिलेल्याम माहिती नुसार, हे नवे स्फोट केव्हापर्यंत चालतील? हे स्पष्ट नाही. मात्र, हे नवे द्वीप इव्हो जीमाचा भाग बनू शकते.