Bangladesh Terror Groups : बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळले असून, आता देशात मोबम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, हे सरकार स्थापन होताच अन्सारुल्ला बांगला टीम (ABT) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरू शकते, कारण ABT ने भारतात आपले दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळेच दोन वर्षांपूर्वी भारतीय यंत्रणांना अनेक महिने दहशतवादविरोधी अभियान राबवावे लागले होते. ABT ही अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) शी संबंधित दहशतवादी संघटना होती.
जशीमुद्दीन रहमानी तुरुंगातून बाहेर बांग्लादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी 27 ऑगस्ट रोजी गाझीपूरच्या उच्च सुरक्षा असलेल्या काशिमपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. त्याच्या एक दिवस आधीच त्याला 2008 च्या एका दहशतवादी प्रकरणात जामीन मिळाला होता. मागील शेख हसीना सरकारने जे शेकडो दहशतवादी आणि इतर गुन्हेगारांना तुरुंगात टाकले होते, त्यात याचाही समावेश होता.
शेख हसीना सरकारने कारवाई केली शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच बांग्लादेशातील दोन तुरुंगातून अनेक संशयित दहशतवाद्यांसह 700 हून अधिक कैदी पळून गेले. त्यामुळे भारताबरोबरच बांग्लादेशातही सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्याची राजकीय अस्थिरता बांग्लादेशातील कट्टरपंथी इस्लामी घटकांच्या एकत्रीकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) च्या सांगण्यावरून हे लोक भारतविरोधी कारवायांमध्येही सहभागी होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
संघटना भारतासाठी का धोका आहे?जाणकारांच्या म्हणण्यानुसार, AQIS आणि इस्लामिक स्टेट प्रामुख्याने पैसा उभारण्यासाठी बांग्लादेश आणि आसपासच्या प्रदेशात त्यांचे नेटवर्क वाढवत होते. पण, सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे भारतीय तरुणांना आपल्या संघटनेत सामावून घेण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
कोण आहे जशीमुद्दीन रहमानी?रहमानी याला 2013 मध्ये सेक्युलर ब्लॉगर राजीव हैदर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. 15 फेब्रुवारी 2013 रोजी रात्री हैदरची ढाका येथील घरासमोर हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी शहर न्यायालयाने फैसल बिन नईम आणि रेझवानुल आझाद राणा या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. रहमानी आणि इतर चौघांना तुरुंगवासाची शिक्षा झा