शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन; जाणून घ्या, आंदोलक विद्यार्थ्यांसह कोणाकोणाचा समावेश?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 2:48 PM

Muhammad Yunus-Led Interim Govt of Bangladesh : या सरकारचे अंतरिम नेतृत्व नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस करत आहेत.

Muhammad Yunus-Led Interim Govt of Bangladesh : ढाका : बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू होता. ही परिस्थिती अखेर नियंत्रणाबाहेर गेल्यामुळं शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला आहे. यानंतर आता परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. या सरकारचे अंतरिम नेतृत्व नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस करत आहेत.

मोहम्मद युनूस यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोहम्मद युनूस यांच्यासोबत आणखी १६ सदस्यांनीही शपथ घेतली आहे, ज्यामध्ये ४ महिलांचाही समावेश आहे. ढाका येथील राष्ट्रपतींचे निवासस्थान बंगभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच दोन २६ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी नेते नाहिद इस्लाम आणि आसिफ मेहमूद यांचा समावेश आहे. या दोघांनी देशभरात झालेल्या आरक्षणविरोधी आंदोलनाचं नेतृत्त्व केलेलं आहे.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली नाहिद इस्लाम, आसिफ मेहमूद, रिजवाना हसन, फरीदा अख्तर, आदिल-उर-रहमान खान, एएफएम खालिद हुसैन, नूरजहाँ बेगम, शर्मीन मुर्शिद, फारुख-ए-आझम, सालेहुद्दीन अहमद, प्राध्यापक आसिफ नजरुल, हसन आरिफ, ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत हुसैन, सुप्रदीप चकमा, प्राध्यापक बिधान रंजन रॉय, तौहीद हुसेन यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकार संकटग्रस्त बांगलादेशाचं नेतृत्त्व करेल. तसंच लोकनियुक्त सरकार सत्तेवर येईपर्यंत त्यांच्याकडे देशाची जबाबादारी असणार आहे.

मोहम्मद युनूस यांच्याविषयी...मोहम्मद युनूस यांचा जन्म २८ जून १९४० रोजी झाला. ते बांगलादेशातील नामवंत उद्योगपती, बँकर आणि अर्थतज्ञ आहेत. मोहम्मद युनूस यांना जगभरात 'गरिबांचा बँकर' या नावानं ओळखलं जातं. मोहम्मद युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या स्थापनेमुळे बांगलादेश व नंतर जगभरातील गरिबांना कर्जाची सुविधा उपलब्ध झाली. विशेष म्हणजे या सुविधेच्या बहुतांश लाभार्थी या महिला होत्या. ग्रामीण बँकेची स्थापना करून सूक्ष्म पातळीवर कर्ज आणि अर्थपुरवठा याबाबत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल २००६ मध्ये त्यांचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

बांगलादेश बँकेच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामे बांगलादेश बँकेचे डेप्युटी गव्हर्नर काझी सय्यदुर रहमान यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी राजीनामे दिले आहेत. बांगलादेश बँकेचे गव्हर्नर व काही डेप्युटी गव्हर्नर हे बँकेचे नुकसान करणाऱ्यांनाच मदत करत आहेत, असा आरोप तेथील अधिकाऱ्यांनी केला होता. त्यांनी गव्हर्नरच्या कार्यालयावर मोर्चाही काढला होता. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय