क्वालालंपूर : दोन वर्षांपूर्वीच्या संसदीय निवडणुकीत पराभूत झालेल्या मलाय नॅशनलिस्ट पार्टीचे नेते मुहियिद्दीन यासीन यांनी रविवारी मलेशियाचे नवे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली. राजप्रासादात झालेल्या समारंभात मलेशियाचे राजे सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह यांनी ७२ वर्षीय यासीन यांना पदाची शपथ दिली. याआधीचे ९४ वर्षांचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांना राजेसाहेबांनी सक्तीने पायउतार होण्यास भाग पाडल्यानंतर आग्नेय आशियातील या देशात आठवडाभर राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. गेल्या निवडणुकीत महाथीर यांच्या पक्षास संसदेच्या २२२ पैकी ११४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राजेसाहेबांनी यासीन यांना पंतप्रधानपदासाठी निवडल्यानंतर त्यांच्या सरकारचा संसदेत पराभव करण्याची भाषा केली; पण मलेशियाच्या राजकारणात खुलेआम घोडेबाजार होत असल्याने प्रत्यक्षात तसे होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांना वाटत नाही.
मुहियिद्दीन यासीन झाले मलेशियाचे पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 6:33 AM