काबूल - तालिबानने अनेक दिवस विचार केल्यानंतर, मुल्ला मोहम्मद हसन अखुंदच्या नावाची अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती पदासाठी घोषणा केली आहे. द न्यूज इंटरनॅशनलनुसार, बुधवारी तालिबानचे नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे अथवा आणखी काही दिवसांसाठी विलंब होऊ शकतो. तालिबानच्या एका वरिष्ठ नेत्याने द न्यूजशी बोलताना सांगितले, की अमीरुल मोमिनीन शेख हैबतहुल्ला अखुंजादाने स्वतःच मुल्ला मोहम्मद हसन अखुंदचा रईस-ए-जम्हूर किंवा रईस-उल-वजारा किंवा अफगाणिस्तानच्या नव्या मुखाच्या रुपात प्रस्ताव ठेवला होता. मुल्ला बरदार अखुंद आणि मुल्ला अब्दुस सलाम हे त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतील.
कंदहारशी संबंध -तीन तालिबान नेत्यांनी मुल्ला मोहम्मद हसन अखुंदच्या नामांकनाची पुष्टी केल्याचे संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा सध्या तालिबानचे मुख्य निर्णय घेणारी संस्था राहबारी शूरा अथवा नेतृत्व परिषदेचा प्रमुख आहे. तो तालिबानचा जन्म झालेल्या कंदहारचा असल्याचे आणि सशस्त्र चळवळीच्या संस्थापकांपैकी एक आहे, असेही या वृत्तात म्हणण्यात आले आहे. आणखी एक तालिबानी नेत्याने म्हटले आहे, "तो 20 वर्षं राहबरी शूराचा प्रमुख होता आणि त्याने मोठी प्रतिष्ठाही मिळविली." तो सैन्य पार्श्वभूमीपेक्षाही एक धार्मिक नेता म्हणून, चारित्र्यासाठी आणि भक्तीसाठी ओळखला जातो.
विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही! पंजशीरवरील कब्जानंतर तालिबानची धमकी; अमरुल्लाह देश सोडून पळाले
हैबतुल्ला अखुंजादाच्या जवळचा -तालिबानी नेता म्हणाला, मुल्ला हसन 20 वर्षं शेख हैबतुल्ला अखुंजादाच्या जवळ होता. तालिबानच्या म्हणण्यानुसार, मुल्ला हसन त्याच्या आधीच्या अफगाणिस्तान सरकारच्या काळात महत्त्वाच्या पदांवर होता. त्याचप्रमाणे तालिबानने म्हटले आहे की, हक्कानी नेटवर्कचा मुख्य तालिबानी नेता सिराजुद्दीन हक्कानीला संघीय अंतर्गत कामकाजमंत्री म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. पूर्वेकडील प्रांतांसाठी राज्यपालांची नियुक्ती करण्याचा अधिकारही त्यांना असेल. याचप्रमाणे तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहम्मद उमरचा मुलगा मुल्ला याकूबला अफगाणिस्तानचा संरक्षण मंत्री करण्यात आले आहे.
मुल्ला याकूबने वैयक्तिकरित्या अलीकडील सशस्त्र मोहिमेचे नेतृत्व केले आणि जिल्ह्यांसह ग्रामीण भाग काबीज करण्यास सुरुवात केली आणि नंतर देशभरातील प्रांत काबीज करण्याचा निर्णय घेतला.
तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!
कुणाला मिळाली इतर मंत्रालये -तालिबानच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिदला आता राज्याचा प्रमुख मुल्ला हसन अखुंदचा प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, मुल्ला अमीर खान मुत्ताकीला परराष्ट्र मंत्री म्हणून नुयुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.