काबूल : तालिबानमधील सत्तासंघर्ष चिघळला असून, तालिबानप्रमुख मुल्ला ओमर मरण पावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चारच दिवसांत मुल्ला ओमरच्या मुलाची-मुल्ला याकूब याची पाकिस्तानातील क्वेट्टा शहरात हत्या झाली आहे. अफगाण वृत्तसेवा टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार क्वेट्टा शहरात मुल्ला याकूब याला मारण्यात आले आहे, असे अफगाणिस्तानच्या वोलेसी जिरगा (कनिष्ठ सभागृह) चे उपनेते झाहीर कदीर यांनी वृत्त दिले. मुल्ला ओमरचा मृत्यू झाल्यानंतर तालिबानमध्ये सत्तासंघर्ष उफाळला आहे. तालिबानची सत्ता हाती घेण्यासाठी मुल्ला याकूब व सध्याचा प्रमुख मुल्ला मन्सूर यांच्यात मुल्ला ओमरची जागा मिळवण्यासाठी संघर्ष चालू होता. तालिबानमधील विरोधी गट व पाकिस्तान यांचा मुल्ला याकूबच्या हत्येत हात असल्याचे कदीर यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
मुल्ला ओमरच्या मुलाची हत्या
By admin | Published: August 04, 2015 11:31 PM