मॉस्को : रशियाचे माजी उपपंतप्रधान आणि विद्यमान विरोधी पक्षनेते बोरिस नेम्तसोव्ह (५५) यांच्या हत्येने देशात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात असंतोष वाढला आहे. राजधानी मॉस्कोत सरकारविरोधी रॅलीच्या दोन दिवसांपूर्वीच शुक्रवारी भररस्त्यात विरोधी पक्षनेत्याच्या हत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, नेम्तसोव्ह यांना आदरांजली वाहण्यासाठी येथे आयोजित रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते.नेम्तसोव्ह यांनी रविवारी युक्रेनमध्ये सुरू संघर्षाविरुद्ध एका रॅली आयोजित केली होती. या घोषणानेनंतर काही तासांतच त्यांही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, नेम्तसोव्ह हे क्रेमलिननजीकचा पूल ओलांडत असताना जवळून जाणाऱ्या कारमधील अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात नेम्तसोव्ह यांच्या शरीरात चार गोळ्या गेल्या.राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या हत्येचा निषेध केला आहे. पुतीन यांनी स्वत:हून या हत्येच्या चौकशीवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, नेम्तसोव्ह यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय हेतूने ही हत्या झाल्याचा आरोप करीत यास पुतीनच जबाबदार असल्याचा दावा केला आहे. (वृत्तसंस्था)
पुतीनविरोधी नेत्याची हत्या; हजारोंचा मोर्चा
By admin | Published: March 01, 2015 11:39 PM