शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा! बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही- अमेरिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 2:01 PM

लोकांना हिंदू मंदिरे, चर्च किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरील हल्ल्यांबद्दल माहिती देण्यासाठी बांगलादेशच्या सरकारने हॉटलाइन स्थापन केली आहे.

ढाका/वॉशिंग्टन: बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केल्याचा आरोप अमेरिकेचे  व्हाईट हाऊसने फेटाळून लावला आहे. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर बांगला देशात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव कॅरिन जीन पियर यांनी सांगितले की, ‘बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेत आमचा सहभाग नाही. या घटनांमध्ये अमेरिकी प्रशासनाचा सहभाग असल्याच्या कोणत्याही बातम्या किंवा अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. बांगलादेशातील लोकांचे भविष्य ठरवणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे. 

हिंदूंसाठी हॉटलाइन

- लोकांना हिंदू मंदिरे, चर्च किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरील हल्ल्यांबद्दल माहिती देण्यासाठी बांगलादेशच्या सरकारने हॉटलाइन स्थापन केली आहे. - शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि भारतात आश्रय घेतल्यानंतर धार्मिक स्थळे, दुकाने आणि अल्पसंख्याकांच्या मालमत्तेची तोडफोड केल्याच्या बातम्यांदरम्यान हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सरकारविषयी मत बनवण्यापूर्वी संयम बाळगा

- बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी मंगळवारी येथील प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरात पीडित हिंदू समुदायाच्या सदस्यांची भेट घेऊन दिलासा दिला. - पूजाउजपन परिषदेचे अध्यक्ष बासुदेव धर, सरचिटणीस संतोष शर्मा, सर्वजनीन पूजा समितीचे अध्यक्ष जयंत कुमार देव, सरचिटणीस तपस चंद्र पाल आणि हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषदेच्या अध्यक्षीय सदस्य काजोल देबनाथ आणि संयुक्त महासचिव मनींद्र कुमार नाथ उपस्थित होते.

काय घडले?

- बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि संसदीय निवडणुका घेण्याच्या प्रयत्नांचे राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी स्वागत केले आहे.- ढाका येथील भारतीय व्हिसा केंद्राचे  मर्यादित कामकाज पुन्हा सुरू.

शेख हसीना यांच्या नजीकच्या अधिकाऱ्यांचे राजीनामे वैध : युनूस

- माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांचे राजीनामे वैध आहेत, असा दावा बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी केला. - ‘सर्व पावले कायदेशीररीत्या उचलण्यात आली आहेत. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य बहाल करण्याला अंतरिम सरकारचे प्राधान्य आहे,’ असे सांगत युनूस यांनी माजी सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांना ‘जल्लाद’ असे संबोधले.

दुकान मालकाच्या मृत्युप्रकरणात गुन्हा

बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि इतर सहाजणांविरुद्ध गेल्या महिन्यात झालेल्या हिंसक संघर्षादरम्यान एका किराणा दुकानमालकाच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मंगळवारी उघडकीस आले. भारतात शरण घेतलेल्या हसीना यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशAmericaअमेरिका