वॉशिंग्टन : अमेरिकेतील इंडियानापोलीस शहरातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा सुरक्षा संचालक मुंबईत जन्मलेला मुसलमान पोलीस अधिकारी आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वातावरण तापत असताना, धार्मिक सहिष्णुता, धार्मिक एकोपा व परस्परांच्या श्रद्धांचा आदर राखण्यास बळ देणारी ही घटना आहे.हे मंदिर १० दशलक्ष अमेरिकेन डॉलर खर्चून उभारण्यात आले आहे. मंदिराच्या सुरक्षेचे संचालक असलेले लेफ्टनंट जावेद खान यांनी तायक्वांदो मार्शल आर्ट व किक बॉक्सिंगमध्ये आठ ब्लॅकबेल्ट मिळविले आहेत. ते स्थानिक पोलीस विभागात नोकरीला आहेत. या मंदिराला रोज सरासरी ४०० भाविक भेट देतात. जावेद खान यांचा जन्म मुंबईतील. ते लहानाचे मोठे लोणावळा आणि पुणे येथे झाले.‘आपण सगळे एक असून सगळी देवाची लेकरे आहोत, असे मला वाटते,’ असे खान म्हणाले. ‘आम्ही भारतीय आहोत. माझे अर्धे कुटुंब हिंदू असून हिंदू-मुस्लीम भेदावर माझा विश्वास नाही. मी माझे कर्तव्य करीत असून, वेगळे काहीच नाही,’ असेही खान म्हणाले.
अमेरिकेतील हिंदू मंदिराचा सुरक्षा प्रमुख मुस्लीम पोलीस
By admin | Published: July 25, 2016 4:10 AM