क्वालालंपूर : मलेशियात परमेश्वर या शब्दासाठी अल्लाह हा शब्द वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. काही वर्षापासून चाललेल्या या वादावर आता पडदा पडला आहे.
येथील कॅथॉलिक चर्चने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. 2क्क्7 साली मलेशिया सरकारने परमेश्वर या शब्दासाठी अल्लाह हा शब्द वापरण्यास मनाई केली होती. हेराल्ड या वृत्तपत्रत मलय भाषेत अल्लाह हा शब्द वापरला होता. गृहमंत्रलयाने घातलेली ही बंदी उठविण्यास फेडरल न्यायालयाने नकार दिला. मलेशियाची प्रशासकीय राजधानी पुत्रजया येथील न्यायालयातील सात सदस्यीय खंडपीठाने खालच्या न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश अफरिन झकारिया यांनी यासंदर्भात 4 विरुद्ध 3 मते पडल्यानंतर बहुमताचा निर्णय कायम ठेवला. एवढय़ा मोठय़ा खंडपीठाने निकाल दिल्याचे मलेशियातील हे पहिलेच प्रकरण आहे. यासंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली. (वृत्तसंस्था)