ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि.21- 'मुस्लिमांनो चालते व्हा' असं फलक आपल्या हॉटेलच्या बाहेर लावणा-या व्यक्तिलाच चक्क मशिदीमध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. अमेरिकेतील एका हॉटेल मालकाने मुस्लिम गेट आउट असं फलक आपल्या लावलं होतं. हा व्यक्ती अमेरिकेच्या मिन्नेसोटायेथील एका घटनेने दुःखी होता त्या रागातूनच त्याने 'मुस्लिम गेट आउट' असा फलक लावला होता.
डॅन र्युडिन्जेर असं या हॉटेल मालकाचं नाव आहे. मिन्नेसोटायेथील मॉलमध्ये एका मुस्लिम व्यक्तीने 8 जणांना चाकू भोसकून जखमी केलं होतं. नंतर पोलिसांनी त्याला ठार केलं. मात्र या घटनेच्या रागातून डॅन यांनी थेट आपल्या हॉटेल बाहेर मुस्लिम गेट आउट असं फलक लावलं.
'सर्व मुस्लिमांना नाही फक्त कट्टर मुस्लिमांना लक्ष्य करणं हा उद्देश आहे. विरोध करणं हा माझा हक्क आहे, आणि मी तो करणारच. इतरांनीही यामध्ये माझी साथ द्यावी' असं सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डॅन म्हणाले.
मिन्नेसोटायेथील अमेरिकी-इस्लाम परिषदेचे कार्यकारी संचालक जयलानी हुसेन यांनी डॅन यांना मशिदीत येण्याचं निमंत्रण दिलं . इस्लाम धर्माविषयी आणि मुस्लिम समाजाविषयी माहिती देण्यासाठी त्यांना हे निमंत्रण देण्यात आलं आहे.