ढाका : बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील (१९७१) युद्ध गुन्हेगार मति-उर- रहमान निजामी (७३) याची फाशीची शिक्षा बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम राखली. निजामी हा ‘जमात-ए- इस्लामी’चा प्रमुख आहे. स्वातंत्र्ययुद्धात त्याने अल बद्र मिलिशिया या संघटनेद्वारे अत्यंत क्रूररीत्या बांगलादेशातील बुद्धिजीवींच्या हत्येचा कट रचला होता. (वृत्तसंस्था)
मति-उर-निजामीचा मृत्युदंड कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2016 11:57 PM