प्रश्न - माझा मुलगा अमेरिकन नागरिक असून तो अमेरिकेत राहातो, मला त्याच्याबरोबर राहायचं आहे. मी त्यासाठी कोणत्या व्हीसासाठी अर्ज करू?उत्तर- तुम्ही कोणत्या उद्देशाने प्रवास करणार आहात, त्यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. तुम्हाला थोडाच काळ तेथे राहुन पुन्हा भारतात यायचं आहे का? तुम्हाला त्याच्याबरोबर राहाण्यासाठी कायमचं अमेरिकेला जायचं आहे का? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नॉनइमिग्रंट की इमिग्रंट व्हिसा निवडावा हे सांगू शकेल.जर तुम्हाला तुमच्या मुलाकडे फक्त थोड्याच काळासाठी जायचं असेल तर तुम्ही नॉनइमिग्रंट व्हीजिटर व्हीसासाठी अर्ज करावा. जेव्हा तुम्ही या व्हीसावर अमेरिकेत प्रवेश कराल तेव्हा अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकारी तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत अमेरिकेत राहाण्याच्या परवानगीला मान्यता देतील.जर तुम्हाला तुमच्या मुलाबरोबर दीर्घकाळ राहायचे असेल तर तुमच्या मुलाने फॅमिली बेस्ड पिटिशनसाठी अर्ज करावा. हा अर्ज यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्विसेस (युसिस) येथे करावा. भारतीय अर्जदाराचा अर्ज त्यांच्या अमेरिकेत राहाणाऱ्या जवळच्या नातेवाईकाने किंवा अमेरिकन कर्मचाऱ्याने स्पॉन्सर करावा लागेल. इमिग्रेशन व्हीसासाठी इर्ज करण्यापुर्वी तुमच्याकडे याची पूर्तता केलेली असली पाहिजे. फक्त व्हीजीटर व्हीसावर अमेरिकेत जायचे की तिकडे कायमचे स्थलांतरित व्हायचे हा निर्णय महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा असू शकतो. आम्ही सर्व अर्जदारांना आमच्या संकेतस्थळावर website at ustraveldocs.com/in वर अमेरिकन व्हीसासाठी लागणारी सर्व माहिती घ्यावी असे सुचवतो.
अमेरिकेतल्या मुलाबरोबर राहायचं असेल तर कोणत्या व्हीसासाठी अर्ज करु?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 3:41 PM