शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Myanmar civilians protest: म्यानमारमध्ये चीनविरोधात निदर्शनं, मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले लोक

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 12, 2021 4:42 PM

वेगवेगळ्या वयोगटातील लोक चीनविरोधातील या निदर्शनात सामील झाले होते. यावेळी समाजातील सर्व लोक या निदर्शनात पाहायला मिळाले. गेल्या 1 फेब्रुवारीला म्यानमारच्या लष्कराने सत्तापालट केल्याची घटना घडली आहे. (Myanmar civilians protest against China)

ठळक मुद्देम्यानमारच्या जनतेने शुक्रवारी चीनविरोधात जोरदार निदर्शनं केलीवेगवेगळ्या वयोगटातील लोक चीनविरोधातील या निदर्शनात सामील झाले होते.गेल्या 1 फेब्रुवारीला म्यानमारच्या लष्कराने सत्तापालट केल्याची घटना घडली आहे.

यंगून -म्यानमारमध्ये सत्तापालटानंतर चीनने (China) लष्करशहा जनरल मीन आंग हलिंगचे समर्थन केले आहे. या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या (Myanmar) जनतेने शुक्रवारी चीनविरोधात जोरदार निदर्शनं केली. यावेळी चीनच खरा गुन्हेगार आहे. तो शांतता प्रीय देशाच्या जीवनात अशांतता निर्माण करत आहे, असे निदर्शकांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर "त्यांनी लष्कराला लोकशाही पणाला लावण्यासाठी भाग पाडले," असेही एका निदर्शकाने म्हटले आहे. (Myanmar civilians protest against china)

वेगवेगळ्या वयोगटातील लोक चीनविरोधातील या निदर्शनात सामील झाले होते. यावेळी समाजातील सर्व लोक या निदर्शनात पाहायला मिळाले. "लष्करशहाचे समर्थन करणे बंद करा," असे लिहिलेले अनेक बॅनरदेखील यावेळी निदर्शकांच्या हातात दिसून आले. यापूर्वी म्यानमारमध्ये जनरल मीन आंग हलिंगविरोधातही लाखो लोकांनी निदर्शन केले होते.

म्यानमारमध्ये पोलिसांची आंदोलनकर्त्यांवर कारवाई; निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा

गेल्या 1 फेब्रुवारीला म्यानमारच्या लष्कराने सत्तापालट केल्याची घटना घडली आणि नोव्हेंबर 2020 च्या निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप करत नॅशनल लीग ऑफ डेमोक्रसीचे (NLD) लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले सरकार उखडण्यात आले. 

अनेक नेते म्यानमार लष्कराच्या ताब्यात -म्यानमारमध्ये अशांतता निर्माण करण्यावरून नेपाळ, हाँगकाँग आणि इतर काही देशांतही चीन विरोधात निदर्शने झाली आहेत. सध्या मानमारमधील अनेक नेते म्यानमार लष्कराच्या ताब्यात आहेत. यात आंग सान सू की आणि राष्ट्रपती विन म्यिंट यांचाही समावेश आहे. याच बरोबर सध्या म्यानमारमध्ये एका वर्षाच्या आणीबाणीचीही घोषणा करण्यात आली आहे.

म्यानमार : सत्तांतरानंतर आंग सान सू कुठे आहेत याची माहिती नाही; ४०० पेक्षा अधिक खासदार नजरकैदेत

म्यानमारमध्ये पोलिसांची आंदोलनकर्त्यांवर कारवाई - म्यानमारमध्ये सत्तापालटाच्या विरोधात सातत्याने निदर्शने सुरू आहेत. निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाईदेखील केली आहे. ही निदर्शने अवैध आहेत, असे पोलिसांनी आधीच सांगितले असले तरी शेकडो लोक रस्त्यांवर उतरत आहेत. गेल्या मंगळवारी या निदर्शकांना हटविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला होता. तसेच निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्यांचाही मारा केला होता. म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शहर असलेल्या मंडालेमध्ये निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले होते. तेथून पोलिसांनी 24 पेक्षा अधिक जणांना अटक केली होती.

म्‍यानमारच्या सत्तापालटानं चीनची झोप उडाली; लष्कर सत्तेत आल्यानं ड्रॅगनला सतावतेय मोठी भीती!

 

टॅग्स :Myanmarम्यानमारchinaचीनPoliceपोलिसSoldierसैनिक