म्यानमारमधील जेड खाणीत भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तब्बल 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अनेक मजूर अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. देशाच्या अग्निशमन विभाग आणि सूचना मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. या घटनेचा एक थरारक व्हिडीओही समोर आला आहे.
म्यानमारच्या काचिनमध्ये जेड-समृद्ध हापाकांत क्षेत्रात शेकडो मजूर दगड फोडण्याचे काम करत होते. याच दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. भूस्खलन झाले आणि सर्व मजूर जमिनीखाली दबले गेले. यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासने घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन विभागाने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहात कुटुंबीयांसमवेत धरला ठेका
Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च
CoronaVirus News : धोका वाढला! ५ दिवसांत १ लाख नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ
"मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस"