नै पि ता : म्यानमारच्या रखीन राज्यातील ‘दहशतवाद्यांचा हिंसाचार’ काळजी करण्यासारखा असल्याची म्यानमारची चिंता योग्य असल्याचे भारताने बुधवारी म्हटले. म्यानमारचे ऐक्य आणि भौगोलिक एकात्मता अबाधित ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या प्रमुख आँग सान सू की यांच्याशी येथे बोलताना केले.मोदी यांचा हा पहिलाच म्यानमार दौरा आहे. मोदी व सू की यांच्यात चर्चा झाल्यानंतर, मोदी यांनी संयुक्त वृत्तपत्र निवेदनात म्यानमारला ज्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे, ते प्रश्न आम्हाला काळजीचे वाटत असल्याचे म्हटले.सू की यांनी म्यानमारने नुकतेच ज्या दहशतवादाला तोंड दिले, त्याबद्दल भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेबद्दल आभार मानले. रखीन राज्यात गेल्या महिन्यात रोहिंग्या दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला करून, १२ सुरक्षा कर्मचाºयांना ठार मारले होते. की म्हणाल्या की,‘‘भारत आणि म्यानमारने एकत्रितपणे अशी काळजी घेतली पाहिजे की, आपापल्या देशात किंवा शेजारच्या देशात दहशतवाद मुळे धरणार नाही.’’
रखाइनमधील हिंसाचाराबाबत म्यानमारची चिंता योग्यच , मोदी यांचे निवेदन : आँग सान सू की यांनी मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:02 AM