सिडनी: ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातील संशोधकांच्या दाव्याने एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संघाचे संशोधन अॅस्ट्रोफिजिकल रिसर्च जनरलमध्ये प्रकाशित झालंय. त्यात म्हटलंय की, या वर्षी जानेवारीमध्ये आकाशगंगेच्या मध्यभागी रहस्यमय रेडिओ लहरी सापडल्या आहेत. सापडलेल्या रेडिओ लहरी अगदी नवीन आहेत. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागात ऑस्ट्रेलियन स्क्वेअर किलोमीटर अॅरे पाथफाइंडर (एएसकेएपी) रेडिओ दुर्बिणीसह आकाश स्कॅन करत असताना टीमला त्याचे पहिले संकेत मिळाले.
अनेकदा सिग्नल डिटेक्ट झालेसह-लेखक म्हणून संशोधनात सहभागी असलेल्या सिडनी विद्यापीठाच्या प्राध्यापक तारा मर्फी यांनी सांगितले की, पहिल्या सिग्नलनंतर काही आठवड्यांत सिग्नल आणखी 4 वेळा दिसले. ASKAP J173608.2-321635 नावाच्या स्त्रोताकडून सिग्नल आला, जो काही काळानंतर गायब झाला. काही महिन्यांनंतर, सिग्नल पुन्हा दोन वेळा सापडले. कधीकधी अनेक दिवस सिग्लन येत नाही, तर कधीतरी एकाच दिवशी अनेक वेळा सिग्नल येतात आणि जातात.
सिग्नलचा वेग खूप अनाकलनीय
शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार, फक्त सिग्नलची वेळ अनाकलनीय नव्हती, तर त्याचा वेगही खूप जास्त होता. संशोधकांचा दावा आहे की हे रेडिओ स्पेक्ट्रमपेक्षा 100 पट वेगवान असू शकतात. दरम्यान, संशोधकांनी असेही म्हटले आहे की याचा अर्थ असा नाही की त्यांनी एलियन शोधला आहे.
तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर सिग्नल मिळाले
संशोधकांच्या टीमने मीरकॅट रेडिओ दुर्बिणीची मदत घेतली. रेडिओ सिग्नल व्यतिरिक्त, सिग्नलचे फोटो देखील यासह घेतले जाऊ शकतात. संशोधकांना सुरुवातीचे तीन महिने कुठलेही यश मिळाले नाही, पण फेब्रुवारीमध्ये त्यांना संकेत मिळाले. तो एक अतिशय शक्तिशाली सिग्नल होता. दुसऱ्या प्रयत्नात आणखी एक संकेत मिळाला.