Atlantic ocean : समुद्राच्या तळाशी साधारण 2.73 किलोमीटर खोलात पाण्याच्या आत काही रहस्यमय छिद्र आढळून आले आहेत. जे बघून वैज्ञानिकही हैराण झाले आहेत. हे छिद्र अटलांटिक महासागरात आढळून आले आहेत. याचे काही फोटोही समोर आले आहेत.
सामान्यपणे समुद्री तळ हे समतल आणि वाळूने भरलेले असतात. पण वैज्ञानिकांना तळाशी काही छोटे छोटे छिद्र दिसून आले आहेत. ते स्पष्ट आहेत आणि एका लाइनमध्ये आहेत. या छिद्रांबाबत वैज्ञानिक काहीच स्पष्टपणे सांगू शकलेले नाहीत.
नॅशनल ओसिएनिक अॅन्ड एटमोस्फेटिक अॅडमिनिस्ट्रेशनला समुद्राच्या आत ही छिद्रे एका पायलट प्रोजेक्ट दरम्यान आढळून आलेत. ज्यांना ही छिद्रे आढळून आली ते म्हणाले की, ही छिद्रे मनुष्यांनी तयार केल्याचं दिसत आहेत. पण हे लोक या ठिकाणी कसे पोहोचले याबाबत काहीच माहिती नाही.
दरम्यान, काही वैज्ञानिक मिड-अटलांटिक रिजवर तपास करत होते. समुद्राचा हा भाग अनएक्प्लोरड आहे. म्हणजे इथे अजून कुणी गेलं नाही. असं सांगितलं जातं की, समुद्राच्या या भागात पाण्यात मोठ मोठे डोंगर आहेत. NOAA ने सांगितलं की, आम्हा लोकांना समुद्राच्या तळाशी छिद्रांचे सबलिनिअर सेट्स दिसून आले. या भागात याआधीही अशाप्रकारची छिद्रे दिसून आली होती. पण हे इथे कसे आलेत याची कोणतीही माहिती नाही.
हा शोध 23 जुलैला लावण्यात आला होता. जेव्हा वैज्ञानिक Azores च्या नॉर्थमध्ये असलेल्या एका अंडरवॉटर ज्वालामुखीजवळ पोहोचले होते. हे ठिकाण समुद्र तळापासून साधारण 2.7 किलोमीटर आत होतं. वैज्ञानिक आपल्यासोबत कॅमेरा घेऊन गेले होते. त्यांनी ही छिद्रे कॅमेरात रेकॉर्ड केलेत.